दौलताबादजवळ भीषण अपघातात आई-वडील, मुलगा जागीच ठार, जावई-लेक गंभीर जखमी, भरधाव कार अवजड वाहनाला धडकली…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : भरधाव कार रस्त्यावर उभ्या असलेल्या अज्ञात वाहनावर धडकली. यात आई-वडिलांसह मुलाचा मृत्‍यू झाला, तर दोघे जखमी झाले. ही भीषण दुर्घटना शनिवारी (६ जून) पहाटे साडेचारच्या सुमारास सोलापूर-धुळे महामार्गावरील दौलताबादनजिकच्या फतियाबाद येथे घडली. हे कुटुंब कन्‍नड तालुक्यातील अंधानेर येथे बाळू मामाच्या मंदिरात दर्शनासाठी गेले होते. परतताना काळाने त्‍यांच्यावर […]

छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : भरधाव कार रस्त्यावर उभ्या असलेल्या अज्ञात वाहनावर धडकली. यात आई-वडिलांसह मुलाचा मृत्‍यू झाला, तर दोघे जखमी झाले. ही भीषण दुर्घटना शनिवारी (६ जून) पहाटे साडेचारच्या सुमारास सोलापूर-धुळे महामार्गावरील दौलताबादनजिकच्या फतियाबाद येथे घडली. हे कुटुंब कन्‍नड तालुक्यातील अंधानेर येथे बाळू मामाच्या मंदिरात दर्शनासाठी गेले होते. परतताना काळाने त्‍यांच्यावर घाला घातला.

राजू आसाराम उचित (वय ६०), अलका राजू उचित (वय ५५) आणि अर्जुन राजू उचित (वय २५, रा. वाळूज, ता. गंगापूर) अशी मृत्‍यू झालेल्यांची नावे आहेत. किरण भाऊसाहेब दहितुले (वय २५)आणि त्यांची पत्नी आरती किरण दहितुले (वय २२, रा. कांगुणी, जि. अहमदनगर) हे गंभीर जखमी झाले आहेत. राजू उचित हे पत्नी, मुलगा, जावई किरण व मुलगी आरती यांच्यासह शुक्रवारी रात्री अकराला कारने अंधानेरला गेले होते.

दर्शन घेऊन शनिवारी पहाटे परतत असताना फतियाबादजवळील एका हॉटेलसमोर रस्त्यावर उभ्या एका अज्ञात अवजड वाहनावर त्यांची कार जोरात आदळली. अपघातानंतर अवजड वाहनचालक वाहनासह पसार झाला. किरण व आरती यांच्यावर छत्रपती संभाजीनगर शहरातील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. दौलताबाद पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे. शनिवारी दुपारी चारच्या सुमारास आई-वडील, मुलावर वाळूज येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. एकुलता एक मुलगा असलेल्या अर्जुनचे तीन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. त्‍याची पत्नी काही दिवसांपूर्वी माहेरी सातारा येथे गेल्याचे सूत्रांनी सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या

Latest News

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : केकत जळगाव (ता. पैठण) येथील अल्पभूधारक शेतकरी भास्कर बाबुराव मगर (वय ३५) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून...
प्रेम प्रकरणात मदत करत असल्याच्या संशयावरून तरुणावर लोखंडी रॉड, बेल्टने बेदम मारहाण, रोहिदासपुऱ्यातील घटना
दारूच्या नशेत मित्रानेच आवळला मित्राचा गळा!; खुनाचे गूढ २४ तासांत उकलले, बिडकीनजवळील पैठणखेड्याची घटना
Good News : शेंद्र्याजवळील जयपूर एमआयडीसीत महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनी १५० एकरवर साकारणार प्रकल्प!
बौद्ध समाजमंदिरावर चालवला जेसीबी!; पाडळसा उपसरपंचाचे कृत्य, गंगापूर तालुक्यातील खळबळजनक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software