दोन हत्‍यांनी छत्रपती संभाजीनगर हादरले!; चिकलठाणा परिसरातील घटना, मित्र, शेजारीच उठले २ तरुणांच्या जिवावर

On
"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ऐन दिवाळीत छत्रपती संभाजीनगर शहर दोन हत्‍यांनी हादरले. शेजारी, मित्रच दोघांच्या जिवाचे वैरी ठरले. अगदी क्षुल्लक कारणावरून या हत्‍या झाल्या. चिकलठाणा परिसरातील हिनानगर आणि सुंदरवाडी भागात या घटना घडल्या आहेत. चिकलठाण्याच्या हिनानगरातील उमर जफर मशिदीजवळ इरफाना आयास शेख (वय ३६) या पती व मुलासह राहतात. त्‍यांच्या मुलीचे लग्न झालेले असून, […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ऐन दिवाळीत छत्रपती संभाजीनगर शहर दोन हत्‍यांनी हादरले. शेजारी, मित्रच दोघांच्या जिवाचे वैरी ठरले. अगदी क्षुल्लक कारणावरून या हत्‍या झाल्या. चिकलठाणा परिसरातील हिनानगर आणि सुंदरवाडी भागात या घटना घडल्या आहेत.

चिकलठाण्याच्या हिनानगरातील उमर जफर मशिदीजवळ इरफाना आयास शेख (वय ३६) या पती व मुलासह राहतात. त्‍यांच्या मुलीचे लग्न झालेले असून, तिला मुलगा झाल्याने बाळंतपणासाठी त्‍यांच्याकडे आली होती. ३ नोव्‍हेंबरला रात्री साडेनऊच्या सुमारास घरासमोर राहणाऱ्या परवीन शेख हिच्या लहान मुलाने इरफाना शेख यांच्या घरासमोर येऊन फटाके वाजवले. त्‍यामुळे इरफाना या परवीनकडे गेल्या आणि सांगितले, की आमच्या घरी लहान बाळ आहे. फटाके बाजूला फोडायला सांगा. यामुळे परवीनला राग आला आणि तिने शिवीगाळ सुरू केली. त्‍यामुळे दोघींत भांडण होऊन दोघीही सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी आल्या.

मात्र पोलीस ठाण्यात त्यांच्यात तडजोड होऊन दोघी घरी परतल्या. मात्र दोघी घरी येताच पुन्हा त्‍यांच्यात जुंपली. यातून परवीनच्या कुटुंबाने इरफानाच्या घरातील सदस्यांना मारहाण सुरू केली. परवीनचे भाऊ सलमान पठाण, अर्शद उर्फ आदा पठाण, अझहर पठाण यांनी इरफाना यांचा भाऊ एजाज गणी शेख याला मारहाण सुरू केली. परवीन, तिची आई मेहरुनिसा, मुलगी जवेरिया शेख यांनीदेखील मारहाण सुरू केली. या वादात अर्शदने एजाज यांच्या डोक्यात दगड घातला. एजाज रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर कोसळला. त्‍याला मिनी घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, सहायक पोलीस निरीक्षक भारत पाचोळे यांनी आरोपींना अटक केली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक जगन्नाथ मेनकुदळे तपास करत आहेत.

पार्टीनंतर मित्रांनीच केली मित्राची हत्‍या…
पार्टी केल्यानंतर घरी जाताना वाद होऊन तीन मित्रांनी मित्राचीच चाकूने हत्‍या केली. ही घटना सिडको एमआयडीसी परिसरातील सुंदरवाडीत समोर आली. सुनील शंकर दनके (वय २५, रा. सुंदरवाडी) असे हत्‍या झालेल्याचे नाव आहे. तो खासगी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्‍याचे मित्र रॉमेल उर्फ समीर फ्रैंकलिन मकासरे (वय २२), शिवा अरुण बारबिंडे (वय २३, दोघेही रा. चिकलठाणा) व मयूर उर्फ येडा अण्णा माणिक मोरे (वय २२, रा. सुंदरवाडी) अशी संशयितांची नावे आहेत.

सुनील त्‍यांच्यासोबत २७ ऑक्‍टोबरला रात्री पार्टी करायला गेला होता. घरी येताना तिघांनी मिळून सुनीलसोबत भांडण सुरू केले. एकटक का पाहतोस, असे म्हणत त्याच्या छाती व डोक्‍यात तिघांनी धारदार वस्तूने वार केले. गंभीर जखमी सुनीलचा रुग्णालयात १ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या सूचनेवरून सहायक पोलीस निरीक्षक भारत पाचोळे यांच्या पथकाने खुन्यांच्या मुसक्या आवळल्या. पोलीस अंमलदार संजय नंद, प्रकाश सोनवणे, संतोष सोनवणे, हैदर शेख, संतोष गायकवाड, वर्षा पवार यांनी ही कारवाई केली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विद्यापीठात केमिकल टेक्नॉलॉजी विभागात स्पॉट अ‍ॅडमिशन फेरी

Latest News

विद्यापीठात केमिकल टेक्नॉलॉजी विभागात स्पॉट अ‍ॅडमिशन फेरी विद्यापीठात केमिकल टेक्नॉलॉजी विभागात स्पॉट अ‍ॅडमिशन फेरी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील केमिकल टेक्नॉलॉजी विभागात एम. फार्मसी अभ्यासक्रमांच्या रिक्त जागांसाठी...
आयआरसीटीसीच्या कन्फर्म तिकिटात नाव बदलायचे कसे?
सकाळ होईपर्यंत झोप येत नाही, कूस बदलत राहता? आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं, देसी टॉनिक, येईल सुखाची झोप!
Beauty Feature : फिल्टरसारखा लूक तेही मेकअपमधून!; जाणून घ्या ब्लरिंग मेकअप, लग्नाच्या सिझनमध्ये खूप येईल कामी!!
नशेखोराचा कहर : आधी लिफ्ट मागितली, नंतर रस्‍त्‍यात गाडी थांबवून दारू पिण्यासाठी पैसे मागत १८ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण, मनपा आयुक्‍तांच्या निवासस्थानाजवळील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software