- News
- सिटी क्राईम
- दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींचा डबक्यात बुडून मृत्यू; घातपाताचा संशय, पैठण तालुक्यातील घटना, छत्रपत...
दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींचा डबक्यात बुडून मृत्यू; घातपाताचा संशय, पैठण तालुक्यातील घटना, छत्रपती संभाजीनगर शहरातही १७ वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
बिडकीन, ता. पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : पाणरांजणगाव (ता. पैठण) शिवारातील डबक्यात दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींचे मृतदेह रविवारी (२५ ऑगस्ट) दुपारी आढळल्याने खळबळ उडाली आहे. डबक्यात बुडून मृत्यू झाल्याबद्दल संशय असून, नातेवाइकांनी घातपात असल्याचे म्हटले आहे. कोणीतरी कपड्यांत दगड घालून त्यांना बुडवल्याची शंका व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. बकऱ्या चारण्यासाठी या बहिणी गेल्या […]
बिडकीन, ता. पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : पाणरांजणगाव (ता. पैठण) शिवारातील डबक्यात दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींचे मृतदेह रविवारी (२५ ऑगस्ट) दुपारी आढळल्याने खळबळ उडाली आहे. डबक्यात बुडून मृत्यू झाल्याबद्दल संशय असून, नातेवाइकांनी घातपात असल्याचे म्हटले आहे. कोणीतरी कपड्यांत दगड घालून त्यांना बुडवल्याची शंका व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. बकऱ्या चारण्यासाठी या बहिणी गेल्या होत्या.
छत्रपती संभाजीनगर शहरातील हिमायतबागेतील शक्कर बावडीत तीन मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या महेश आसाराम जगधने (वय १७, नागेश्वरवाडी) याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (२५ ऑगस्ट) दुपारी घडली. चारपैकी एकालाच पोहता येत होते. तरी सर्व जण विहिरीत उतरले. महेश बुडू लागला. बाकीच्यांनी त्याला वाचवायचा प्रयत्न केला. पण यश आले नाही. पोलिसांना कळताच त्यांनी तातडीने अग्निशमन विभागाला कळवले. अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन महेशला विहिरीबाहेर काढले. घाटी रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. महेशचे नववीपर्यंत शिकलेला होता. कुटुंबाला मदत करण्यासाठी हॉटेलमध्ये काम करत होता, असे पोलिसांनी सांगितले. बेगमपुरा पोलिसांनी अाकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग
By City News Desk
Latest News
14 Mar 2026 10:59:13
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : केकत जळगाव (ता. पैठण) येथील अल्पभूधारक शेतकरी भास्कर बाबुराव मगर (वय ३५) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून...

