दुचाकी घसरून एकाचा मृत्‍यू, दुसऱ्याची प्रकृती गंभीर, दौलताबादजवळील दुर्घटना, दोघेही जळगावचे…

On
"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र

दौलताबाद (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर ते खुलताबाद मार्गावरील दौलताबादजवळील अब्दिमंडीजवळ दुचाकी घसरून एकाचा मृत्‍यू तर दुसरा जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी (२ ऑगस्ट) दुपारी एकच्या सुमारास झाला. प्रीतम प्रेमदास पवार (वय ३१, रा. लोंजे, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) असे मृत्‍यू झालेल्याचे तर समाधान रुपचंद पवार (वय २७, रा. लोंजे, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) असे […]

दौलताबाद (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर ते खुलताबाद मार्गावरील दौलताबादजवळील अब्दिमंडीजवळ दुचाकी घसरून एकाचा मृत्‍यू तर दुसरा जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी (२ ऑगस्ट) दुपारी एकच्या सुमारास झाला.

प्रीतम प्रेमदास पवार (वय ३१, रा. लोंजे, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) असे मृत्‍यू झालेल्याचे तर समाधान रुपचंद पवार (वय २७, रा. लोंजे, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) असे जखमीचे नाव आहे. दोघे चुलत भाऊ कामानिमित्त दुचाकीने (एमएच १९, सीएस २७३३) शुक्रवारी सकाळी छत्रपती संभाजीनगरला आले होते. काम आटोपून दुपारी गावाकडे निघाले. अब्दिमंडीजवळ त्यांची दुचाकी घसरून दोघेही रस्त्यावर पडले.

दौलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ, ज्ञानेश्वर कोळी, महेश घुगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने दोघांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी तपासून प्रीतम पवार याला मृत घोषित केले, तर समाधान पवारवर उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद दौलताबाद पोलिसांनी घेतली आहे. प्रीतम पवार यांचे वडील प्रेमदास पवार एसटी महामंडळात वाहक असून, प्रीतम गावात कृषी सेवा केंद्र चालवत होते. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी व १ वर्षाचा मुलगा आहे.

दौलताबाद किल्‍ल्‍याजवळ दुसरा अपघात…
दौलताबाद येथील किल्ल्याजवळ शुक्रवारी रात्री साडे नऊला दुचाकी घसरून आणखी एक अपघात झाला. अजय डोंगरसिंग राठोड, भारतसिंग डोंगरसिंग राठोड (रा. रांजणगाव शे.पुं., ता. गंगापूर) हे जखमी झाले. ते छत्रपती संभाजीनगरहून खुलताबादकडे निघाले होते. किल्ल्याजवळ आल्यानंतर दुचाकी घसरून दोघेही जखमी झाले. त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विद्यापीठात केमिकल टेक्नॉलॉजी विभागात स्पॉट अ‍ॅडमिशन फेरी

Latest News

विद्यापीठात केमिकल टेक्नॉलॉजी विभागात स्पॉट अ‍ॅडमिशन फेरी विद्यापीठात केमिकल टेक्नॉलॉजी विभागात स्पॉट अ‍ॅडमिशन फेरी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील केमिकल टेक्नॉलॉजी विभागात एम. फार्मसी अभ्यासक्रमांच्या रिक्त जागांसाठी...
आयआरसीटीसीच्या कन्फर्म तिकिटात नाव बदलायचे कसे?
सकाळ होईपर्यंत झोप येत नाही, कूस बदलत राहता? आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं, देसी टॉनिक, येईल सुखाची झोप!
Beauty Feature : फिल्टरसारखा लूक तेही मेकअपमधून!; जाणून घ्या ब्लरिंग मेकअप, लग्नाच्या सिझनमध्ये खूप येईल कामी!!
नशेखोराचा कहर : आधी लिफ्ट मागितली, नंतर रस्‍त्‍यात गाडी थांबवून दारू पिण्यासाठी पैसे मागत १८ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण, मनपा आयुक्‍तांच्या निवासस्थानाजवळील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software