दहीहंडी उत्‍सव पाहण्यासाठी आलेल्या तरुणींची छेड; टवाळखोरांना कपडे फाटेपर्यंत मारहाण, गुलमंडी चौकातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी आलेल्या तरुणींची एका गटातील तरुणांनी छेड काढली. याबद्दल दुसऱ्या गटातील तरुणांनी जाब विचारला. त्यावरून वाद वाढत जाऊन छेड काढणाऱ्यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण करण्यात आली. वेळीच पोलीस धावून आल्याने तणाव निवळला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद नव्हती. हा प्रकार गुलमंडी चौकात मंगळवारी (२८ ऑगस्ट) सायंकाळी घडला. पोलिसांचा […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी आलेल्या तरुणींची एका गटातील तरुणांनी छेड काढली. याबद्दल दुसऱ्या गटातील तरुणांनी जाब विचारला. त्यावरून वाद वाढत जाऊन छेड काढणाऱ्यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण करण्यात आली. वेळीच पोलीस धावून आल्याने तणाव निवळला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद नव्हती. हा प्रकार गुलमंडी चौकात मंगळवारी (२८ ऑगस्ट) सायंकाळी घडला. पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी तैनात होता.

शहरात एकूण ६४ ठिकाणी दहीहंडी महोत्‍सवाचे आयोजन केले होते. रात्री ११ पर्यंत गोविंदा पथकांचा थरार सुरू होता. गोविंदांनी ८ थरांची तयारी केली होती, पण प्रत्‍यक्षात ६ थरच गोविंदा रचू शकले. गुलमंडी, टीव्ही सेंटर, गजानन महाराज मंदिर चौक, सुतगिरणी चौक, जिजाऊ चौकासह अनेक ठिकाणी दहीहंडी फुटली. आकर्षक रोषणाई, लेझर शो, डीजे महोत्‍सवाचे आकर्षण होते. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. क्रांतीचौकात धर्मराज दानवे यांनी प्रथमच मातृभूमी दहीहंडी महोत्‍सवाचे आयोजन केले होते. सर्वांत मोठे ५ लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस या दहीहंडीला ठेवले होते. मात्र ८ थर लावण्याची अट होती. ते काही कुणाला जमले नाही. त्‍यामुळे बक्षीसही कुणाला मिळाले नाही. सहभागी पथकांना ४ हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यंदा दहीहंडी महोत्‍सवात महिला, तरुणींचा सहभाग उल्लेखनीय होता.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest News

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूल भागातील सुरेवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात ३ जण गंभीर जखमी तर...
खबरदार... छत्रपती संभाजीनगरमध्ये नायलॉन मांजा वापराल तर... विकणाऱ्या दोघांना अटक, वापर करणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन
'वाईट कमेंट वाचून त्यांना फटकारावेसे वाटत होते...; अभिनेत्री नेहा धुपियाची विशेष मुलाखत
Business News : भाजी विक्रेत्याने जिंकली ११ कोटींची पंजाब राज्य लॉटरी, त्याला किती उत्पन्न कर भरावा लागेल?
दोन वेगवेगळ्या घटना : वाळूज एमआयडीसीत दुचाकीसह शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू, घाटीजवळील गर्ल्स होस्टेलजवळ आढळला मृतदेह
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software