तुम्ही फसतातच कसे?; सायबर भामट्यांनी दोघांना असा लावला ६ लाखांचा चुना!, वेदांतनगर, सातारा पोलिसांत तक्रारी…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सायबर भामट्याने एसबीआयच्या क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याची थाप मारून सरकारी अधिकाऱ्याला ४ लाख २३ हजार रुपयांनी गंडा घातला. वेदांतनगर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. अनिल तायडे (रा. वेदांतनगर) असे फसवणूक झालेल्यांचे नाव आहे. त्यांच्या मोबाइलवर एका अनोळखी मोबाइलधारकाने कॉल करून तो एसबीआय क्रेडीट कार्डचा अधिकारी असल्याचे सांगितले. […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सायबर भामट्याने एसबीआयच्या क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याची थाप मारून सरकारी अधिकाऱ्याला ४ लाख २३ हजार रुपयांनी गंडा घातला. वेदांतनगर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.

अनिल तायडे (रा. वेदांतनगर) असे फसवणूक झालेल्यांचे नाव आहे. त्यांच्या मोबाइलवर एका अनोळखी मोबाइलधारकाने कॉल करून तो एसबीआय क्रेडीट कार्डचा अधिकारी असल्याचे सांगितले. तायडे यांना एसबीआय क्रेडीट कार्डचा आंतरराष्ट्रीय वापर बंद करण्यासाठी व्हॉट्स ॲपवर लिंक पाठविल्याचे सांगितले. प्ले स्टोअरवरून एक ॲप डाऊनलोड करण्यास त्याने भाग पाडले.

तायडे यांनी ते ॲप मोबाइलमध्ये डाऊनलोड करताच भामट्याने तायडे यांच्या बँक खात्यातून परस्पर ४ लाख ४८ हजार रुपये काढून घेतले. यातील २५ हजार रुपये तायडे यांच्या खात्यात परत आले. तायडे यांनी शुक्रवारी (२८ जून) वेदांतनगर पोलिसांत तक्रार दिली. अन्य एका घटनेत एमआयटी कॉलेजचा विद्यार्थी अतुल राजेंद्र गायकवाड याला चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगाराने २ लाख १४ हजार ८०० रुपयांचा गंडा घातला. याविषयी सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पैसा, बाटली नंतर लोंढेंच्या खुनामागे ‘बाई’सुद्धा!, तिच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने विशालच्या डोक्यात सणक गेली, बंदुकीतून गोळी झाडली!!, छत्रपती संभाजीनगरातील हत्याकांडाला अनेक पदर...

Latest News

पैसा, बाटली नंतर लोंढेंच्या खुनामागे ‘बाई’सुद्धा!, तिच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने विशालच्या डोक्यात सणक गेली, बंदुकीतून गोळी झाडली!!, छत्रपती संभाजीनगरातील हत्याकांडाला अनेक पदर... पैसा, बाटली नंतर लोंढेंच्या खुनामागे ‘बाई’सुद्धा!, तिच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने विशालच्या डोक्यात सणक गेली, बंदुकीतून गोळी झाडली!!, छत्रपती संभाजीनगरातील हत्याकांडाला अनेक पदर...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सेवानिवृत्त प्राध्यापक राजाराम सुभराव लोंढे (वय ६०, रा. ज्योतीनगर) यांच्या हत्येच्या तपासात अनेक धक्कादायक...
एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला...
वाळूज एमआयडीसीतील ऑर्किड इंग्रजी शाळेला गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिली समज, नियमबाह्य फी वसूल करू नका!
‘तुमच्या मुलीला सुखात ठेवीन...’ प्रॉमिसवर सारिकाच्या आईने ठेवला विश्वास, प्रेमविवाहाला भरला होकार, सोपवला मुलीचा हात!; पण पुढे जे घडलं, ते धक्कादायक... छत्रपती संभाजीनगरच्या सिडकोची हृदयद्रावक घटना
अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software