ड्रंक ॲन्‍ड ड्राइव्ह… मद्यधुंद कारचालकाने ६ गाड्यांना उडवले, कार थांबवून चालकाने अंधाराचा फायदा घेत काढला पळ, सेवानिवृत्त मुख्याध्यपिका गंभीर जखमी, आकाशवाणी चौकाजवळील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आकाशवाणी चौकाजवळ मद्यधुंद कारचालकाने सहा गाड्यांना उडवले. यात नंतर कार थांबवून अंधाराचा फायदा घेत पसार झाला. कारच्या धडकेत दुचाकीस्वार सेवानिवृत्त मुख्याध्यापिका गंभीर जखमी झाल्या आहेत. हा थरार रविवारी (२२ सप्टेंबर) रात्री आठच्या सुमारास घडला. काळी फोर्ड कंपनीची आलिशान कार (एमएच ०२ बीएम ६२९६) सेव्हन हिल उड्डाणपुलाकडून क्रांती चौकाकडे सुसाट निघाली […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आकाशवाणी चौकाजवळ मद्यधुंद कारचालकाने सहा गाड्यांना उडवले. यात नंतर कार थांबवून अंधाराचा फायदा घेत पसार झाला. कारच्या धडकेत दुचाकीस्वार सेवानिवृत्त मुख्याध्यापिका गंभीर जखमी झाल्या आहेत. हा थरार रविवारी (२२ सप्टेंबर) रात्री आठच्या सुमारास घडला.

काळी फोर्ड कंपनीची आलिशान कार (एमएच ०२ बीएम ६२९६) सेव्हन हिल उड्डाणपुलाकडून क्रांती चौकाकडे सुसाट निघाली होती. जालना रोडवरून नातेवाइकांना भेटण्यासाठी निघालेल्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका छाया पळसकर (वय ६०, रा. गुलमोहर कॉलनी) यांच्या दुचाकीला (एमएच २० डीएल ५२०४) आधी कारने मागून धडक दिली. यात पळसकर गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर कारने रस्त्याच्या कडेला उभ्या रिक्षाला (एमएच २० ईके ३५९५) उडवले. पुढे आणखी चार वाहनांना उडवत कार वेगात आकाशवाणी चौकात आली. त्या ठिकाणी कारचे पुढील टायर फुटले. त्‍याही स्थितीत चालकाने कार दामटली, वाहतूक पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला, त्यांना हुलकावणी देऊन कार त्‍याने आकाशवाणीमागच्या रस्त्याने नेत सिंधी कॉलनीत आल्यावर अंधाराचा फायदा घेऊन कार रस्त्यावरच सोडून चालकासह गाडीतील दुसरी व्यक्ती पळून गेली.

कारमध्ये मागील सीटवर महागड्या बँडच्या दारूच्या बाटल्या मिळाल्या. डिक्कीतही दारूच्या बाटल्या ठेवलेल्या होत्या. पोलिसांनी दारूच्या बाटल्‍या जप्त करून अपघातग्रस्त दुचाकी, रिक्षाही पोलीस ठाण्यात आणली. रिक्षाचालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, कारचालकाचा शोध युद्धपातळीवर घेतला जात आहे. कार पश्चिम मुंबई आरटीओत नोंदणीकृत आहे. तिचा मूळ मालक उमेश वल्लाप्पील असून, गाडीत आढळलेल्या मालक कागदपत्रानुसार सध्या सय्यद मुजाहिद हुसेन जरीवाला (रा. अंधेरी) यांच्या मालकीची ही कार असल्याचे निदर्शनास आले. कार १४ वर्षे ११ महिने जुनी असून, फिटनेस ५ ऑक्‍टोबर २०२४ रोजी संपणार आहे. इन्‍शुरस २६ सप्‍टेंबर २०२२ रोजी संपला आहे. पीयूसीसुद्धा २१ जून २०२२ रोजी संपली आहे. जवाहरनगर पोलिसांनी कार टोइंग करून ठाण्यात आणली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

शहर पोलीस दलात खळबळ : आरोपी न करण्यासाठी मागितले १४ लाख!; व्हिडीओ व्हायरल, बेगमपुऱ्याचा अंमलदार गायकवाड निलंबित, PI जगताप यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी!!

Latest News

शहर पोलीस दलात खळबळ : आरोपी न करण्यासाठी मागितले १४ लाख!; व्हिडीओ व्हायरल, बेगमपुऱ्याचा अंमलदार गायकवाड निलंबित, PI जगताप यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी!! शहर पोलीस दलात खळबळ : आरोपी न करण्यासाठी मागितले १४ लाख!; व्हिडीओ व्हायरल, बेगमपुऱ्याचा अंमलदार गायकवाड निलंबित, PI जगताप यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी!!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बेगमपुरा पोलीस ठाण्याचा पोलीस अंमलदार गणेश गायकवाड याने वरिष्ठांच्या नावे तब्बल १४ लाख रुपयांची...
आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक, नोकरी मागण्यासाठी आला होता...
कामगारानेच मालकाचा केला विश्वासघात!; मोंढा नाक्यावरील मेट्रो वाईन शॉपमध्ये काय घडलं... व्हिडीओसह, पहा कशी केली चोरी...
माणुसकीचे अनोखे दर्शन : मुलाच्या फीचे हरवलेले ३० हजार रुपये तत्परतेने केले महिलेस परत, सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, सिडकोतील घटना
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software