- Marathi News
- सिटी क्राईम
- घाटीत एक्स रे काढण्यासाठी टॉप वर करण्यास सांगून अश्लील चाळे!; नराधम शेख मोहम्मदचे कृत्य
घाटीत एक्स रे काढण्यासाठी टॉप वर करण्यास सांगून अश्लील चाळे!; नराधम शेख मोहम्मदचे कृत्य
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वासनांच्या विकृतीने सध्या छत्रपती संभाजीनगरवासियांचे डोके काम करेनासे झाले आहे. अशा विचित्र आणि संतापजनक घटना घडत आहेत, की त्या वाचून, ऐकून सर्वांचे डोके सुन्न होऊन जात आहे. घाटी रुग्णालयातही संतापजनक घटना समोर आली आहे. घाटी रुग्णालयात एक्स रे काढण्यासाठी आलेल्या २६ वर्षीय तरुणीला टॉप वर करायला सांगून तिला अश्लील स्पर्श […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वासनांच्या विकृतीने सध्या छत्रपती संभाजीनगरवासियांचे डोके काम करेनासे झाले आहे. अशा विचित्र आणि संतापजनक घटना घडत आहेत, की त्या वाचून, ऐकून सर्वांचे डोके सुन्न होऊन जात आहे. घाटी रुग्णालयातही संतापजनक घटना समोर आली आहे. घाटी रुग्णालयात एक्स रे काढण्यासाठी आलेल्या २६ वर्षीय तरुणीला टॉप वर करायला सांगून तिला अश्लील स्पर्श केल्याचा धक्कादायक प्रकार नराधम टेक्निशियन शेख मोहम्मद फरहान शेख नदीमोद्दीन (वय २३, रा. मजनू हिल) याने केला. ही बाब समोर येताच बेगमपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला गुरुवारी (२९ ऑगस्ट) अटक केली. शेख मोहम्मदला कोरोना काळात कंत्राटी म्हणून घाटीने कामावर घेतले होते, त्यानंतर कामावरून काढले होते. तरीही त्याला एक्स रे रूममध्ये प्रवेश कसा मिळाला, असा सवाल निर्माण झाला आहे.
बेगमपुऱ्यातील तरुणीला रविवारी (२५ ऑगस्ट) छातीत वेदना होत होत्या. ती आईसोबत सायंकाळी साडेसातला घाटी रुग्णालयात आली. डॉक्टरांनी तिला एक्स-रे काढायला सांगितला. घाटीतील एक्स रे विभागात तीन शिफ्टमध्ये ड्युटी असते. दुपारी २ ते रात्री ८ या वेळेत एक्स-रे तंत्रज्ञ अश्विनी कल्याण अगवान यांची ड्युटी होती. डॉ. वर्षा रोठे या विभागाच्या प्रमुख आहेत. त्या एक्स-रे, सोनोग्राफी, एमआरआय, सिटी स्कॅन विभागात डॉक्टर, तज्ज्ञांची ड्यूटी लावतात. त्यांनी नेमून दिलेले डॉक्टर, कर्मचारीच तेथे काम करू शकतात. तंत्रज्ञ अश्विनी अगवान या गर्भवती असल्याने त्यांनी शेख मोहम्मदला तरुणीचा एक्स-रे काढायला सांगितला. त्याने आधी तरुणीला कपडे काढायला सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नराधम शेख मोहम्मद याला कोरोना काळात २०१९-२० मध्ये कंत्राटी टेक्निशियन म्हणून कामाला घेतले होते. कंत्राट संपल्यानंतर त्याला कामावरून कमी केले. तरीही त्याचे विभागात येणे-जाणे सुरू होते. गरजेनुसार अनधिकृतरीत्या कामावर बोलावले जात होते. नोकरी गेल्यानंतरही त्याच्याकडे घाटीचे ओळखपत्र होते. ते घालून तो घाटीत सगळीकडे फिरत होता. त्याने अशा पद्धतीने अनेक तरुणी, मुली, महिलांचे विनयभंग केलेले असू शकतात. घटना घडली त्यावेळी तंत्रज्ञ अश्विनी अगवान यांची ड्युटी होती.
४ वर्षांपूर्वीच त्या बदलीने घाटीत रुजू झाल्या असून, सध्या गर्भवती असून, रोज बीडवरून ये-जा करतात. या घटनेमुळे त्यांना प्रशासनाने निलंबित केले असून, त्यांची विभागीय चौकशीही लावली आहे, असे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी सांगितले. आता यापुढे महिला, तरुणी एक्स-रे, सोनोग्राफी,एमआरआयसाठी आल्यास सोबत आत एक चतुर्थश्रेणी महिला कर्मचारी असणार आहे. एक्स रे विभागाच्या सर्व चाचणींसाठी नर्स नियुक्त असणार आहेत. महिला रुग्णासोबत कुटुंबातील महिला सदस्याला प्रवेश असेल.
