गावठी कट्टा विकायला आलेल्या तरुणाला सापळा रचून पकडले!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसी पोलिसांनी गावठी कट्टा विकण्यासाठी आलेल्या २४ वर्षीय तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत. रविवारी (२७ ऑक्‍टोबर) रात्री वाळूज एमआयडीसीतील वडगाव कोल्हाटीत ही कारवाई करण्यात आली. सूरज किसन पाईकराव (वय २४, रा. वडगाव धानोरा, ता. पुसद, जि. यवतमाळ, ह. मु. रांजणगाव शेणपुंजी, छत्रपती संभाजीनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसी पोलिसांनी गावठी कट्टा विकण्यासाठी आलेल्या २४ वर्षीय तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत. रविवारी (२७ ऑक्‍टोबर) रात्री वाळूज एमआयडीसीतील वडगाव कोल्हाटीत ही कारवाई करण्यात आली.

सूरज किसन पाईकराव (वय २४, रा. वडगाव धानोरा, ता. पुसद, जि. यवतमाळ, ह. मु. रांजणगाव शेणपुंजी, छत्रपती संभाजीनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून ३० हजारांचा देशी बनावटीचा कट्टा व ५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. वडगाव-तीसगाव रोडवरील नायरा पेट्रोलपंपाजवळ सूरज देशी कट्टा विक्रीसाठी आला होता. पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर यांना कळताच त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, दिनेश बन, पोलीस अंमलदार विनोद नितनवरे, बाळासाहेब आंधळे, राजाभाऊ कोल्हे, जालिंधर रंधे, सुरेश कचे, मनमोहन कोलीमी, यशवंत गोबाडे, विशाल पाटील, मनोज बनसोडे, नितीन इनामे, गणेश सागरे, समाधान पाटील, हनुमान ठोके यांच्यासह सापळा रचून सूरजला ताब्‍यात घेतले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या

Latest News

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : केकत जळगाव (ता. पैठण) येथील अल्पभूधारक शेतकरी भास्कर बाबुराव मगर (वय ३५) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून...
प्रेम प्रकरणात मदत करत असल्याच्या संशयावरून तरुणावर लोखंडी रॉड, बेल्टने बेदम मारहाण, रोहिदासपुऱ्यातील घटना
दारूच्या नशेत मित्रानेच आवळला मित्राचा गळा!; खुनाचे गूढ २४ तासांत उकलले, बिडकीनजवळील पैठणखेड्याची घटना
Good News : शेंद्र्याजवळील जयपूर एमआयडीसीत महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनी १५० एकरवर साकारणार प्रकल्प!
बौद्ध समाजमंदिरावर चालवला जेसीबी!; पाडळसा उपसरपंचाचे कृत्य, गंगापूर तालुक्यातील खळबळजनक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software