गणेश विसर्जन मिरवणुकीत दगडफेक; मागच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी समोरच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांवर केला दगडांचा तुफान मारा…; २ तरुणींसह ७ जण जखमी, छत्रपती संभाजीनगरातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : गणेश विसर्जन मिरवणुकीत मागे असलेल्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुढील मंडळाच्या कार्यकर्त्यांवर दगडफेक केली. यात २ मुली व ५ तरुण जखमी झाले आहेत. ही घटना गुरुदत्तनगर परिसरातील जानकी हॉटेलजवळ मंगळवारी (१७ सप्टेंबर) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. मागील मंडळाचे कार्यकर्ते गुलाल फेकत होते, तो गुलाल समोरच्या मंडळाच्या कार्यकर्त्याच्या डोळ्यात गेला. त्यांनी गुलाल […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : गणेश विसर्जन मिरवणुकीत मागे असलेल्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुढील मंडळाच्या कार्यकर्त्यांवर दगडफेक केली. यात २ मुली व ५ तरुण जखमी झाले आहेत. ही घटना गुरुदत्तनगर परिसरातील जानकी हॉटेलजवळ मंगळवारी (१७ सप्टेंबर) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. मागील मंडळाचे कार्यकर्ते गुलाल फेकत होते, तो गुलाल समोरच्या मंडळाच्या कार्यकर्त्याच्या डोळ्यात गेला. त्यांनी गुलाल फेकू नको, असे म्हणताच दगडांचा तुफान मारा सुरू करण्यात आल्याचे प्रत्‍यक्षदर्शींनी सांगितले.

शिक्षक असलेल्या विलास दत्तात्रय देशमुख (वय ३०, रा. भारतनगर, ग. नं. ३, गारखेडा परिसर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते जय योगेश्वर गणेश मंडळाचे अध्यक्ष आहेत. गणेश मूर्ती विसर्जनासाठी गुरुदत्तनगर येथून मंडळाचे कार्यकर्ते आणि गणेशभक्‍त निघाले. जानकी हॉटेलसमोरून पाण्याच्या टाकीजवळ रात्री साडेअकराला आले असता मंडळामागे असलेले हिंदू स्वराज्य नवयुवक गणेश मंडळाचे कार्यकर्ते एकमेकांवर गुलाल फेकत होते.

त्यावेळी देशमुख यांच्या गणेश मंडळातील संघर्ष ढवळे याच्या डोळ्यात गुलाल गेला. त्यामुळे त्या गुलाल फेकणाऱ्या मुलाला गुलाल फेकू नको, असे देशमुख यांनी सांगितले. याचा त्या मुलाला राग येऊन त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. जय योगेश्वर गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्याला समजावून सांगत असताना हिंदू स्वराज्य नवयुवक गणेश मंडळाच्या मुलांनी दगडे फेकून मारायला सुरुवात केली.

दगडफेकीत जय योगेश्वर गणेश मंडळातील मुलगी आरती कारके, भारती कारके यांच्या पायाला दगड लागून त्या जखमी झाल्या. मुलगा संकेत देशमुख याच्या एका डोळ्यावर दगड लागून डोळ्याला गंभीर इजा झाली. कृष्णा वाघ याच्या तोंडावर दगड लागल्याने त्याचे दात पडले. अजय मोटे याच्या कानाला व डोक्यात दगड लागून तो जखमी झाला. संघर्ष ढवळेला त्या मंडळाच्या मुलांपैकी एकाने झेंड्याच्या काठीने मारल्याने तो जखमी झाला. शिक्षक देशमुखही पायाला दगड लागून जखमी झाले. त्यानंतर दगडफेक करणारी मुले पळून जाऊ लागली असता त्यापैकी काही मुलांना आजूबाजूच्या लोकांनी पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले.

दगडफेक करणाऱ्यांची नावे आली समोर…
हिंदू स्वराज्य नवयुवक गणेश मंडळातील दगडफेक करणाऱ्या मुलांविरुद्ध तक्रार करण्यास पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात देशमुख गेले असता दगडफेक करणाऱ्या मुलांना त्यांनी ओळखले. त्यांची नावे अशी : ऋषीकेश मोटे, प्रमोद बोंद्रे, जॅकी यादव, अर्जुन राजपूत, रवींद्र बुटे व राज पारवे. या मुलांशिवाय त्या मंडळातील आणखी १५ ते २० मुलांनी दगडफेक केल्याचे देशमुख यांनी तक्रारीत म्हटले आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद भालेराव करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

टँकर चोरीला जाऊन ८ दिवस उलटल्यावर पोलिसांनी केला गुन्हा दाखल, तक्रारदार चकरा मारून वैतागला, वाळूज एमआयडीसी पोलिसांची कामाची न्यारी तऱ्हा!

Latest News

टँकर चोरीला जाऊन ८ दिवस उलटल्यावर पोलिसांनी केला गुन्हा दाखल, तक्रारदार चकरा मारून वैतागला, वाळूज एमआयडीसी पोलिसांची कामाची न्यारी तऱ्हा! टँकर चोरीला जाऊन ८ दिवस उलटल्यावर पोलिसांनी केला गुन्हा दाखल, तक्रारदार चकरा मारून वैतागला, वाळूज एमआयडीसी पोलिसांची कामाची न्यारी तऱ्हा!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील बजाजनगर येथील वृंदावन पार्कमधून पाण्याचे टँकर चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २ डिसेंबरला...
ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली!
एसटी बसने दागिने घेऊन प्रवास करत असाल तर सतर्क व्हा, चोर महिलांच्या टोळ्या तुमचे दागिने चोरून होतील गायब!, शास्‍त्रीनगरातील महिलेचेही सव्वा लाखाचे दागिने नेले...
सिल्लोडच्या अन्वीत तरुणाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या
आदर्श घोटाळ्यातील संशयित महिला चक्क शिंदे गटात दाखल!  
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software