किराणा दुकानावर दगडफेक करत महिलेला अश्लील शिवीगाळ, टीव्ही सेंटर परिसरातील प्रकार, दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : किराणा दुकान महिलेला अश्लील शिवीगाळ करून तिच्या दुकानावर दगडफेक केल्याची घटना टीव्ही सेंटर एन १२ रोज गार्डनजवळील शताब्‍दीनगरात घडली. सिटी चौक पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सनी कचरू गायकवाड (वय २५, रा. शताब्दीनगर) व जॉन कांबळे (रा. गल्ली नं.२ शताब्दीनगर) अशी दगडफेक केलेल्यांची नावे आहेत. विमलबाई कैलास […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : किराणा दुकान महिलेला अश्लील शिवीगाळ करून तिच्या दुकानावर दगडफेक केल्याची घटना टीव्ही सेंटर एन १२ रोज गार्डनजवळील शताब्‍दीनगरात घडली. सिटी चौक पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सनी कचरू गायकवाड (वय २५, रा. शताब्दीनगर) व जॉन कांबळे (रा. गल्ली नं.२ शताब्दीनगर) अशी दगडफेक केलेल्यांची नावे आहेत.

विमलबाई कैलास कांबळे (वय ४०, रा. गणेश मेडीकलजवळ पावर हाऊस राधास्वामी कॉलनी जटवाडा रोड छत्रपती संभाजीनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्‍यांचे TV सेंटर N-12 रोज गार्डन शताब्दीनगर येथे किराणा दुकान आहे. रविवारी (१२ जानेवारी) रात्री आठच्या सुमारास गल्लीत राहणारा सनी हा विमलबाई यांच्या दुकानासमोरील रस्त्यावर उभा राहिला व मोठ्यामोठ्याने अश्लील शिवीगाळ करू लागला. विमलबाई यांनी त्याच्याविरुद्ध दोन महिन्यांपूर्वी पोलीस तक्रार केली होती.

त्याचा राग मनात धरून तो शिवीगाळ करत होता. तुला चाकूने मारून टाकील तसेच तुझे दुकानातील CCTV कॅमेरे फोडून टाकील, अशी त्याने दिली. भीतीपोटी विमलबाईंनी तेव्हा तक्रार दिली नाही. सोमवारी (१३ जानेवारी) रात्री ९ च्या सुमारास सनी गायकवाड पुन्हा त्‍यांच्या दुकानासमोर आला. त्याने दुकानावर दगड फेकून मारले. दुकानासमोर लावलेल्या CCTV कॅमेऱ्याचे तोडून नुकसान केले. त्याच्यासोबत त्यावेळी जॉन कांबळे हाही होता. त्यानेदखील दुकानावर दगड फेकून बल्ब फोडले. त्‍यानंतर विमलबाई यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात मंगळवारी तक्रार दिली. अधिक तपास पोलीस अंमलदार संजय वाघचौरे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पैसा, बाटली नंतर लोंढेंच्या खुनामागे ‘बाई’सुद्धा!, तिच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने विशालच्या डोक्यात सणक गेली, बंदुकीतून गोळी झाडली!!, छत्रपती संभाजीनगरातील हत्याकांडाला अनेक पदर...

Latest News

पैसा, बाटली नंतर लोंढेंच्या खुनामागे ‘बाई’सुद्धा!, तिच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने विशालच्या डोक्यात सणक गेली, बंदुकीतून गोळी झाडली!!, छत्रपती संभाजीनगरातील हत्याकांडाला अनेक पदर... पैसा, बाटली नंतर लोंढेंच्या खुनामागे ‘बाई’सुद्धा!, तिच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने विशालच्या डोक्यात सणक गेली, बंदुकीतून गोळी झाडली!!, छत्रपती संभाजीनगरातील हत्याकांडाला अनेक पदर...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सेवानिवृत्त प्राध्यापक राजाराम सुभराव लोंढे (वय ६०, रा. ज्योतीनगर) यांच्या हत्येच्या तपासात अनेक धक्कादायक...
एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला...
वाळूज एमआयडीसीतील ऑर्किड इंग्रजी शाळेला गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिली समज, नियमबाह्य फी वसूल करू नका!
‘तुमच्या मुलीला सुखात ठेवीन...’ प्रॉमिसवर सारिकाच्या आईने ठेवला विश्वास, प्रेमविवाहाला भरला होकार, सोपवला मुलीचा हात!; पण पुढे जे घडलं, ते धक्कादायक... छत्रपती संभाजीनगरच्या सिडकोची हृदयद्रावक घटना
अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software