कारच्या पार्किंगसाठी शेजाऱ्याने अर्ध्याहून अधिक रस्ता व्यापला, इकडची गाडी तिकडं जाईना अन्‌ तिकडची इकडं येईना!; पोलिसांकडे जाऊनही उपयोग होईना!!, उत्तमनगरातील रहिवासी वैतागले

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उत्तमनगरातील गल्ली नं. ४ मधील रहिवासी सध्या एका वेगळ्याच अडचणीमुळे त्रस्‍त आहेत. एक व्यक्‍ती त्‍याची टाटा सफारी गाडी ऐन रस्त्यात उभी करून अर्ध्याहून अधिक रस्ता व्यापून टाकतो. कुणी बोलायला गेले की शिवीगाळ करतो. त्‍यामुळे एका रहिवाशाने धाडस करून जवाहरनगर पोलिसांत तक्रार केली. त्‍यावरून अदखलपात्र नोंद घेऊन […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उत्तमनगरातील गल्ली नं. ४ मधील रहिवासी सध्या एका वेगळ्याच अडचणीमुळे त्रस्‍त आहेत. एक व्यक्‍ती त्‍याची टाटा सफारी गाडी ऐन रस्त्यात उभी करून अर्ध्याहून अधिक रस्ता व्यापून टाकतो. कुणी बोलायला गेले की शिवीगाळ करतो. त्‍यामुळे एका रहिवाशाने धाडस करून जवाहरनगर पोलिसांत तक्रार केली. त्‍यावरून अदखलपात्र नोंद घेऊन पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा प्रकार समोर आला आहे.

विजय भानुदास डोके (वय २९, रा. गल्ली नं. ४, उत्तमनगर) यांनी या प्रकरणात जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. टाटा सफारी गाडीमुळे रहदारीस अडथळायेतो. डोके यांची गव्हाची गाडी आली असता तिला घरापर्यंत येण्यास रस्ताच नव्हता. डोके यांनी टाटा सफारी गाडीमालकाला त्‍याची गाडी बाजूला घ्यायला सांगितली असता त्‍याने चक्‍क मी गाडी बाजूला घेणार नाही, असे म्‍हणून शिवीगाळ केली. अनेकदा रुग्णांना नेण्यासाठी येणारी गाडीही घरापर्यंत येऊ शकत नाही, अशी स्थिती आहे. अशा परिस्थितीत पोलिसांनी संबंधिताला कडक समज देऊन, कार रहदारीला अडथळा निर्माण होणार नाही अशा ठिकाणी उभी करण्यास सांगण्याची गरज आहे. मात्र तक्रार देऊनही संबंधित व्यक्‍तीने त्‍याची गाडी जागेवरून हलवली नाही. याकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्‍यान, श्री. डोके यांनी सीएससीएनला कळवले, की आमच्या घरासमोरील व्यक्तीने त्याची बंद पडलेली चारचाकी मुद्दामहून घरासमोर उभी केलेली आहे. त्याला गाडी बाजूला घेण्यास सांगितल्यास तो गल्लीत येऊन अश्लील भाषेमध्ये आई-बहिणीवरून शिवीगाळ करतो. आमच्या घरी धान्याची गाडी आली असता त्याला गाडी बाजूला घेण्यास सांगितले असता तो म्हणतो की गाडीची चावी सापडत नाही. हा व्यक्‍ती मुद्दामहून आम्हाला व गल्लीतल्या लोकांना त्रास देण्याच्या हेतूने असे करत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले...

Latest News

मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले... मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे अंमलदार नितेश जाधव यांच्यासह चौघांविरुद्ध हॉटेलमध्ये केलेल्या राड्याप्रकरणी करमाड पोलिसांनी मंगळवारी...
सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला...
अपघातानंतर फार्मसिस्टला दुचाकीस्वारांची मारहाण, मोबाइल हिसकावून पळाले... चिकलठाण्यातील घटना
भरधाव ट्रकने दुचाकीला मागून ठोकरले, दाम्‍पत्‍यासह चिमुकली जखमी, वाळूज MIDC तील घटना
रांजणगाव शेणपुंजीत एमआयडीसीच्या जागेवर पुतळा, झेंडा, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software