कमळापूरचे बांधकाम व्यावसायिक किशोर लोहकरे यांचा खून, जळालेला मृतदेह मध्यप्रदेशात आढळला, वाळूज एमआयडीसीत खळबळ, संतप्त जमावाने संशयिताच्या घरावर चढवला बुलडोझर, दुचाकी दिली पेटवून

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : वाळूज एमआयडीसीतील कमळापूर येथील बांधकाम व्यावसायिक किशोर बाबुराव लोहकरे (४०, रा. कमळापूर, ता. गंगापूर) यांची हत्या झाल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आाहे. मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील बिंजलवाडा शिवारातील जंगलात त्यांचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह बुधवारी (९ ऑक्टोबर) सकाळी मिळून आला. किशोर लोहकरे यांच्या पश्चात पत्नी आशा, दोन मुले आहेत. दरम्‍यान, लोहकरे […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : वाळूज एमआयडीसीतील कमळापूर येथील बांधकाम व्यावसायिक किशोर बाबुराव लोहकरे (४०, रा. कमळापूर, ता. गंगापूर) यांची हत्या झाल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आाहे. मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील बिंजलवाडा शिवारातील जंगलात त्यांचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह बुधवारी (९ ऑक्टोबर) सकाळी मिळून आला. किशोर लोहकरे यांच्या पश्चात पत्नी आशा, दोन मुले आहेत. दरम्‍यान, लोहकरे यांचा कारचालक जावेद सत्तार शेख (रा. कमळापूर) याच्यावर पोलिसांना संशय असल्याचे समजताच संतप्त जमावाने जावेदच्या घरावर सायंकाळी साडेसातच्या सुमारास हल्ला चढवला. त्‍याच्या घरावर जेसीबी घालून घर पाडण्याचा प्रयत्‍न केला. घरासमोर उभी दुचाकी पेटवून दिली. पोलिसांनी वेळीच धाव घेऊन पुढील अनर्थ टळला.

१७ सप्टेंबरला लोहकरे १० लाख रुपये घेऊन चालक जावेदसह मुंबईला गेले होते. त्यांना सोडून १९ सप्टेंबरला जावेद घरी परतला. लोहकरे यांनी दिलेले १० लाख रुपये त्याने त्यांच्या पत्नीकडे देत कार घरासमोर लावून गेला. २६ सप्टेंबरला लोहकरे यांनी पत्नीला कॉल करून मी इंदूरला चाललो असून, १० लाख रुपये जावेदकडे देण्यास सांगून मुंबईला पाठविण्यास सांगितले. जावेद पैसे घेऊन गेला. पैसे लोहकरे यांना देत २७ सप्टेंबरला तो परतला. कार घरासमोर लावून तो निघून गेला. २८ सप्टेंबरपासून लोहकरे बेपत्ता झाले. कॉल करूनही ते प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे त्यांच्या पत्नीने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात ते हरवल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी शोधकार्य सुरू केले. मोठी रक्कम त्यांच्यासोबत असल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरू केला.

मोबाइलचे शेवटचे लोकेशन निघाले मध्यप्रदेशात…
मोबाइलचे शेवटचे लोकेशन मध्यप्रदेशातील खंडवा होते. त्यामुळे पोलीस मध्यप्रदेशाकडे रवाना झाले. तपास करत असतानाच लोहकरे यांचा मृतदेह बुधवारी सकाळी जळालेल्या अवस्थेत मिळाला. कपडे, अंगठी, हाताला बांधलेल्या दोऱ्यावरून त्यांची ओळख पटली. खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट असून, जावेदची कसून चौकशी सुरू आहे. त्याने पैशासाठी तीन साथीदारांसोबत मिळून हत्या घडवून आणल्याचा पोलिसांना संशय आहे. ते तिघेही मध्य प्रदेशातील आहेत. खुनामागे जावेदचा हात असल्याच्या संशयाने संतप्त जमावाने त्‍याचे घर पाडण्याचा प्रयत्‍न केला. यात घराचा दरवाजा आणि खिडकी तुटली. विशेष म्‍हणजे जावेद राहत असलेले घरही लोहकरे यांचेच आहे. हल्ला होण्याच्या भीतीने जावेदचे कुटुंबीय घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्याने अनर्थ टळला. या घटनेमुळे बुधवारी सायंकाळी रांजणगाव कमळापूर रोडवरील दुकाने बंद करण्यात आली. गावात अनुचित प्रकार घडू नये म्‍हणून रात्रभर बंदोबस्त कायम होता.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला...

Latest News

एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला... एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एमजीएमजवळ अंधारात लपून बसलेल्या तिघांनी पोलिसांना पाहून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले...
वाळूज एमआयडीसीतील ऑर्किड इंग्रजी शाळेला गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिली समज, नियमबाह्य फी वसूल करू नका!
‘तुमच्या मुलीला सुखात ठेवीन...’ प्रॉमिसवर सारिकाच्या आईने ठेवला विश्वास, प्रेमविवाहाला भरला होकार, सोपवला मुलीचा हात!; पण पुढे जे घडलं, ते धक्कादायक... छत्रपती संभाजीनगरच्या सिडकोची हृदयद्रावक घटना
अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software