आदर्श पतसंस्था घोटाळा : उपाध्यक्ष भाऊसाहेब मोगल, संचालक महेंद्र देशमुखला अखेर अटक

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आदर्श पतसंस्थेच्या २०२ कोटींच्या घोटाळा प्रकरणी उपाध्यक्षासह आणखी एका संचालकाला पोलिसांनी आज, २० सप्टेंबरला अटक केली आहे. भाऊसाहेब मल्हारराव मोगल (वय ६६, रा. निलजगाव, ता. पैठण) आणि महेंद्र जगदीश देशमुख (वय ६९, रा. मुकुंद हौसिंग सोसायटी, सिडको एन २) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जिल्हा व सत्र न्‍यायालयात त्‍यांना हजर […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आदर्श पतसंस्थेच्या २०२ कोटींच्या घोटाळा प्रकरणी उपाध्यक्षासह आणखी एका संचालकाला पोलिसांनी आज, २० सप्टेंबरला अटक केली आहे.

भाऊसाहेब मल्हारराव मोगल (वय ६६, रा. निलजगाव, ता. पैठण) आणि महेंद्र जगदीश देशमुख (वय ६९, रा. मुकुंद हौसिंग सोसायटी, सिडको एन २) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जिल्हा व सत्र न्‍यायालयात त्‍यांना हजर केले असता २२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या संशयितांनी बनावट कर्जास मान्यता दिली आहे. ते पदावर असताना रोख स्वरुपात व्यवहार झाले आहेत का, याचा तपास करायचा असल्याने सरकारी पक्षातर्फे पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. आदर्श पतसंस्थेच्या घोटाळा प्रकरणी गेल्या वर्षी ११ जुलैला सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात अध्यक्ष अंबादास मानकापेसह उपाध्यक्ष, संचालक मंडळ मिळून २१ मुख्य आरोपी असून, एकूण ६ गुन्ह्यांत तब्‍बल ११२ आरोपी आहेत. पतसंस्थेचे एकूण ठेवीदार ९२ हजार १६४ आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या

Latest News

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : केकत जळगाव (ता. पैठण) येथील अल्पभूधारक शेतकरी भास्कर बाबुराव मगर (वय ३५) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून...
प्रेम प्रकरणात मदत करत असल्याच्या संशयावरून तरुणावर लोखंडी रॉड, बेल्टने बेदम मारहाण, रोहिदासपुऱ्यातील घटना
दारूच्या नशेत मित्रानेच आवळला मित्राचा गळा!; खुनाचे गूढ २४ तासांत उकलले, बिडकीनजवळील पैठणखेड्याची घटना
Good News : शेंद्र्याजवळील जयपूर एमआयडीसीत महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनी १५० एकरवर साकारणार प्रकल्प!
बौद्ध समाजमंदिरावर चालवला जेसीबी!; पाडळसा उपसरपंचाचे कृत्य, गंगापूर तालुक्यातील खळबळजनक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software