तरुणाची गळा चिरून निर्घृण हत्या, छत्रपती संभाजीनगर हादरले!; जालना रोडवरील सेंट फ्रान्सिस शाळेमागील थरार

On
"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : जालना रोडवरील अपना मार्केटमागील सेंट फ्रान्सिस शाळेचे निर्जन मैदान सध्या नशेखोरांचा अड्डा बनले आहे. याच मैदानावर मंगळवारी (१४ ऑक्‍टोबर) रात्री १०:३० च्या सुमारास २७ वर्षीय तरुणाची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. रात्री उशिरापर्यंत जवाहरनगर पोलीस मारेकऱ्यांच्या शोधात होते.

सुरेश भगवान उंबरकर (वय २७, रा. भानुदासनगर, छत्रपती संभाजीनगर, मूळ रा. जाफराबाद, जि. जालना) असे हत्या झालेल्याचे नाव असून, तो काही दिवसांपासून हेडगेवार रुग्णालयासमोरील आम्लेट सेंटरवर काम करत होता. लग्नानंतर काही वर्षांतच त्याचा घटस्फोट झाला होता. सेंट फ्रान्सिस शाळेच्या मैदानावर रात्रभर मद्यपी आणि नशेखोरांचा वावर असतो. सुरेशचा आक्रोश ऐकून काहींनी दारूड्यांनी धाव घेतली असता काही जण सुरेशचा गळा चिरून पळून जाताना दिसले. मदतीला धावलेल्या दारूड्यांनी जवाहरनगर पोलिसांना कळवले. पोलीस निरीक्षक सचिन कुंभार, पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी धावले.

धारदार शस्त्राने गळा चिरून सुरेशची हत्या करण्यात आल्याचे अंगावर शहारे आणणारे दृश्य होते. पोलिसांनी मृतकाची ओळख पटविली. त्याच्या नातेवाइकांचा शोध घेतला असता त्याची नातेवाइक महिला घटनास्‍थळी आली. सुरेशला अशा अवस्थेत पाहून तिने हंबरडा फोडला. तोपर्यंत फॉरेन्सिक लॅबचे पथकही घटनास्थळी आले होते. मध्यरात्री पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह घाटी रुग्णालयात हलवला. घटनास्‍थळी मोठी गर्दी झाली होती. शेवटचा तो एका मित्रासोबत दिसला होता. त्याची हत्या कुणी व का केली, हे गूढ उकलण्यासाठी पोलीस पहाटेपर्यंत संशयितांची धरपकड करत होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

घरगुती स्वयंपाक, मराठमोळा पाहुणचार... छत्रपती संभाजीनगरला येणाऱ्या पर्यटकांपुढे आता ‘होम स्टे'चा पर्याय!

Latest News

घरगुती स्वयंपाक, मराठमोळा पाहुणचार... छत्रपती संभाजीनगरला येणाऱ्या पर्यटकांपुढे आता ‘होम स्टे'चा पर्याय! घरगुती स्वयंपाक, मराठमोळा पाहुणचार... छत्रपती संभाजीनगरला येणाऱ्या पर्यटकांपुढे आता ‘होम स्टे'चा पर्याय!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : पर्यटननगरी अशी ओळख असलेल्या ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर शहराच्या मराठमोळ्या संस्कृतीचा पर्यटकांना अनुभव घेत...
अझीम प्रेमजी यांचे नाव पाहून भाळला अन् छत्रपती संभाजीनगरचा उद्योगपती ७३ लाखांना खपला; सगळे पैसे गेले बीडच्या बँकेत!
गंगापूर, वैजापूरमध्ये २ भीषण अपघात; २ तरुणांचा जागीच मृत्यू, ३ गंभीर जखमी
दोनदा धिंड काढल्याने अपमानामुळे टिप्याचे मानसिक संतुलन बिघडले, हर्सूल कारागृहात डांबताना पुन्हा पोलिसांवर हल्ला !
३५ वर्षीय महिलेवर बलात्कार करून व्हिडीओ केला व्हायरल!; फुलंब्रीची धक्कादायक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software