बिल्डर दिव्येश देलवाडिया यांना ग्राहकाने बजावली कायदेशीर नोटीस!; अर्धवट घर माथी मारल्याचे प्रकरण, आदेश न पाळणाऱ्याविरुद्ध ‘महारेरा’ काय ॲक्‍शन घेणार? 

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बालाजी बिल्डकॉनचा बिल्डर दिव्येश देलवाडिया यांच्यावर ग्राहकाने फसवणुकीचा आरोप केल्यानंतर आणि ‘महारेरा’नेही कामे पूर्ण करण्याचे आदेश देऊनही बिल्डरने अजूनही कामे पूर्ण केलीच नाही. त्यामुळे ग्राहकाने आता कायदेशीर नोटीस बिल्डरला बजावली आहे.

ग्राहक विजयकुमार गंगाधर दाभाडे (रा. संजयनगर, मुकुंदवाडी) यांनी बिल्डरकडून झालेल्या फसवणुकीची आपबिती मांडली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, की शेंद्रा येथील बालाजी बिल्डकॉनच्या बिल्डर दिव्येश हरिभाऊ देलवाडिया यांच्या ४२ कॉपर स्टोन या रो हाऊस प्रकल्पातील ३० नंबरचे रो हाऊस त्यांनी खरेदी केले. बिल्डरने पूर्ण रक्कम घेऊन घराची ताबा पावती बनवून दिली. मात्र घरातील लाइट फिटिंग, प्लंबिंग, रंगाचे काम करून दिले नाही. याबाबत  वाभाडे यांनी बिल्डर देलवाडिया यांना अनेकवेळा संपर्क करून राहिलेले काम करून देण्याची विनंती केली.

मात्र बिल्डरने प्रतिसाद दिला नाही. अनेक वेळा सांगूनही काम करून दिले जात नसल्याने दाभाडे यांनी वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवून राहिलेले काम करून देण्याची विनंती केली. मात्र नोटिसीलाही बिल्डरने जुमानले नाही. त्यामुळे दाभाडे यांनी ‘महारेरा’कडे बिल्डरची तक्रार केली. त्यावर महारेराने बिल्डरला रो हाऊसची उरलेली कामे एक महिन्यात करून देण्याचे आदेश दिले. हा आदेश देऊन आता दीर्घ काळा लोटला आहे. त्‍यामुळे महारेरा आपला आदेश न मानणाऱ्यावर काय कारवाई करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांची आत्महत्या, पैठण, कन्नड तालुक्यातील हृदयद्रावक घटना

Latest News

कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांची आत्महत्या, पैठण, कन्नड तालुक्यातील हृदयद्रावक घटना कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांची आत्महत्या, पैठण, कन्नड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकरी आत्‍महत्‍येचा आकडा वाढतच असून, पैठण आणि कन्नड तालुक्यात आणखी दोन...
बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन शाखेत ब्रँच मॅनेजरनेच केला घोटाळा!; वाळूज MIDC पोलिसांत गुन्हा दाखल
हिंदू नववर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात उद्या शोभायात्रा, खैरेंनी मंत्री शिरसाट, सावे, अंबादास दानवेंना केले ‘हे’ आवाहन...
पोहताना दम लागून बुडाल्याने तरुणाचा मृत्यू, बिडकीनची घटना
उच्चशिक्षित तरुणांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये थाटला ड्रग्जचा कारखाना!; ड्रग्जविरोधी पथकाने केला पर्दाफाश
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software