रेल्वे स्टेशन रोड ते रेल्वेस्टेशन एमआयडीसीतील रस्त्याला दिले ‘श्री मधुर बजाज मार्ग' नाव

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : १९८५ मध्ये बजाज ऑटो उद्योग समूह स्थापन करणारे प्रख्यात उद्योगपती मधुर बजाज यांच्या छत्रपती संभाजीनगर शहराच्या औद्योगिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातील योगदानाला छत्रपती संभाजीनगर महापालिकेने सलाम केला आहे. शहरातील रेल्वेस्टेशन रोड ते रेल्वेस्टेशन एमआयडीसीतील सीएमआयए इमारतीपर्यंतचा रस्ता आता ‘श्री मधुर बजाज मार्ग' या नावाने ओळखला जाणार असून, हा नामकरण सोहळा शुक्रवारी (२४ ऑक्‍टोबर) मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

१९८५ मध्ये वाळूज परिसरात बजाज उद्योग समूहाच्या स्थापनेसह उद्योगपती मधुर बजाज यांनी शहराच्या विकासात नंतरच्या काळात मोठे योगदान दिले. त्यांच्या योगदानाची दखल घेऊन महापालिकेने रेल्वेस्टेशन एमआयडीसी परिसरातील रस्त्याला त्यांचे नाव द्यावे, अशी मागणी उद्योगपती ऋषीकुमार बागला आणि रवी माछर यांनी केली होती. ही मागणी अखेर महापालिका प्रशासनाने पूर्ण केली. या वेळी महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत, पत्रकार राजेंद्र दर्डा, आमदार संजय केणेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. विनय कुमार राठोड, बजाज ऑटो लिमिटेडचे अध्यक्ष नीरज बजाज, बजाज इलेक्ट्रिकल्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर बजाज, श्रीमती कुमुद मधुर बजाज, मधुर बजाज यांच्या कन्या सरगम बजाज, निमिषा बजाज, अनुरंग जैन यांच्यासह बजाज कुटुंबातील सदस्यांची उपस्थिती होती. छत्रपती संभाजीनगर शहराची ओळख आता ‘ईव्ही कॅपिटल' म्हणून होत असून, या विकासाची बीजे बजाज कुटुंबीयांनी पेरली आहेत, अशा शब्दांत महापालिका आयुक्‍त जी. श्रीकांत यांनी बजाज यांच्या कार्याचा गौरव केला. शेखर बजाज यांनी मधुर बाजार यांच्या शहराच्या विकासातील योगदानाची माहिती दिली. प्रास्ताविक व सूत्रसंचालन सीएमआयएचे अध्यक्ष उत्सव माछर यांनी केले. आभार मिहीर सौंदलगेकर यांनी मानले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना

Latest News

१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना १९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील पंढरपूर येथील कामगार चौकातील श्री जगदीश जयदीप इंडस्ट्रीज कंपनीत १९ वर्षीय तरुणाला...
चिकलठाण्याच्या हिनानगरमध्ये गोदामाला भीषण आग, मंडप डेकोरेशनचे लाखो रुपयांचे साहित्य खाक, आकाशात धुराचे लोट
कोलठाणच्या खाटू श्यामजवळील तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगरची दुर्दैवी घटना
लेक-सुनेला भेटायला गेल्या... उल्कानगरीत चोरट्यांनी घर साफ केले, पावणेदोन लाखांची चोरी !
धक्कादायक : एमजीएम हॉस्पिटलमधून रुग्णाच्या नातेवाइक महिलेची पर्स चोरीला गेली...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software