१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील पंढरपूर येथील कामगार चौकातील श्री जगदीश जयदीप इंडस्ट्रीज कंपनीत १९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच प्रेस मशीनवर बसवल्याने, तसेच सुरक्षा साधनेही न पुरवल्याची त्याची दोन बोटे मशीनमध्ये चेंगरली जाऊन तो जखमी झाला. ही दोन बोटे त्याच्या कामातून गेली असून, करंगळीलाही मुक्का मार लागला. या घटनेला जबाबदार धरून तरुणाने सुपरवायझर, ठेकेदार व कंपनी मालकाविरुद्ध तक्रार दिली. मात्र पोलिसांनी ‘अनोळखी’ व्यक्तीविरुद्ध सोमवारी (२ मार्च) गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पोलीस कंपनीमालकाला पाठिशी घालत असल्याचा संशय निर्माण झाला आहे.

शिवम श्रीचंद्र (वय १९, रा. मसूदपूर, ता. बिधुना जि. औरया राज्य उत्तरप्रदेश, हल्ली मु. गिरीराज हौसिंग सोसायटी, पंढरपूर कामगार चौक) याने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, तो आई -वडिलांसह राहतो. १५ जानेवारीपासून तो कॉन्ट्रॅक्टर आदित्यकडे श्रीजगदीश जयदीप इंडस्ट्रीज कंपनीत मजुरीसाठी जात होता. ३० जानेवारीला सकाळी ८ ला कंपनीत काम करत असताना सुपरवायझर राजू याने त्याला प्रेस मशीनवर काम करण्याचा अनुभव व कोणताही कोर्स केलेला नसताना प्रेस मशीनवर जॉब काढण्यासाठी कामाला लावले. प्रेस मशीनवर काम करण्यासाठी सुरक्षेच्या दुष्टीने हॅन्डग्लोज व इतर कोणतेही साहित्य कंपनीचे मालक, सुपरवायझर, ठेकेदार यांनी पुरविले नाही. यामुळे उजव्या हाताची दोन बोटे प्रेस मशीनमध्ये दबल्याने बोटांचे पूर्ण नुकसान झाले. करंगळीलाही मुक्का मार लागला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना

Latest News

१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना १९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील पंढरपूर येथील कामगार चौकातील श्री जगदीश जयदीप इंडस्ट्रीज कंपनीत १९ वर्षीय तरुणाला...
चिकलठाण्याच्या हिनानगरमध्ये गोदामाला भीषण आग, मंडप डेकोरेशनचे लाखो रुपयांचे साहित्य खाक, आकाशात धुराचे लोट
कोलठाणच्या तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगरची दुर्दैवी घटना
लेक-सुनेला भेटायला गेल्या... उल्कानगरीत चोरट्यांनी घर साफ केले, पावणेदोन लाखांची चोरी !
धक्कादायक : एमजीएम हॉस्पिटलमधून रुग्णाच्या नातेवाइक महिलेची पर्स चोरीला गेली...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software