पैठणच्या शेतकऱ्याची अचाट बुद्धीमत्ता!; केबीसीमध्ये जिंकले ५० लाख!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गावतांडा (ता. पैठण) येथील शेतकरी कैलास कुंटेवाड यांनी कौन बनेगा करोडपती या रिॲलिटी शोमध्ये १४ प्रश्नांची उत्तरे देत ५० लाख रुपये जिंकले. हा भाग सोमवारी (२९ सप्टेंबर) प्रसारित झाला असून, पैठणच्या शेतकऱ्याची ही कामगिरी सध्या जिल्हाभरात कौतुकाची ठरत आहे. या शेतकऱ्याकडे असलेली अचाट बुद्धीमत्ता पाहिल्यानंतर सारेच थक्क झाले आहेत.

कैलास कुंटेवाड यांच्याकडे दोन एकर शेती असून, १ कोटीच्या प्रश्नासाठी त्यांनी लाइफलाइन वापरली होती. मात्र १५ व्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. त्यामुळे खेळ सोडला. ५० लाख रुपयेच जिंकता आले. मात्र तोपर्यंतच्या खेळातून त्यांनी अक्षरशः अभिनेते अमिताभ बच्चनही थक्क झाले होते. या शोमध्ये जाण्यासाठी कैलास हे ६ वर्षांपासून प्रयत्नरत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. विशेष म्हणजे, ११ प्रश्नांसाठी त्यांनी एकही  लाइफलाइन वापरली नव्हती. १२ व्या प्रश्नावेळी ऑडियन्स पोलचा आधार घेऊन योग्य उत्तर दिले.

१ कोटीच्या १५ व्या प्रश्नासाठी त्यांनी दोन्ही लाइफ लाइन वापरल्या. पण तरीही उत्तराबद्दल साशंकता असल्याने त्यांनी तिथेही हुशारी दाखवत खेळ सोडण्याचा निर्णय घेतात. अन्यथा अनेक जण उत्साहाच्या भरात उत्तर देतात आणि मोठी रक्कम गमावून बसतात. पण कुंटेवाड यांनी अत्यंत संयमी भूमिका घेतली. ५० लाखांतून आता ते मुलांना चांगले शिक्षण देणार आहेत. कुंटेवाड हे शेतीतून महिन्याला अवघे ३- ४ हजार रुपये कमाई करतात. त्यांना क्रिकेटचे प्रचंड वेड. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने त्यांचे क्रिकेट हे फक्त मनोरंजनापुरतंच राहिलं. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना क्रिकेट अकॅडमीत प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या

Latest News

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : केकत जळगाव (ता. पैठण) येथील अल्पभूधारक शेतकरी भास्कर बाबुराव मगर (वय ३५) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून...
प्रेम प्रकरणात मदत करत असल्याच्या संशयावरून तरुणावर लोखंडी रॉड, बेल्टने बेदम मारहाण, रोहिदासपुऱ्यातील घटना
दारूच्या नशेत मित्रानेच आवळला मित्राचा गळा!; खुनाचे गूढ २४ तासांत उकलले, बिडकीनजवळील पैठणखेड्याची घटना
Good News : शेंद्र्याजवळील जयपूर एमआयडीसीत महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनी १५० एकरवर साकारणार प्रकल्प!
बौद्ध समाजमंदिरावर चालवला जेसीबी!; पाडळसा उपसरपंचाचे कृत्य, गंगापूर तालुक्यातील खळबळजनक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software