जीएसटी घटली अन् छत्रपती संभाजीनगरकरांची शॉपिंग दीडपटीने वाढली!; खरेदीदारांमुळे बाजारपेठेत चैतन्य; व्यापारी खुश!

On
"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीमध्ये झालेली कपात छत्रपती संभाजीनगरमधील सर्वसामान्य खरेदीदारांसह व्यापाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने आनंद घेऊन आली. जीएसटीमध्ये कपात झाल्याने वस्तूंच्या दरात प्रचंड घट झाली असून, त्यामुळे बाजारातील खरेदीदार वाढल्याचे चित्र गेल्या दोन दिवसांत छत्रपती संभाजीनगरच्या बाजारात दिसून आले. बाजारातील उत्साह पाहता गतवर्षीच्या तुलनेत यंदा छत्रपती संभाजीनगरकरांची खरेदी तब्बल दीड पटीने वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

शनिवार, रविवार आणि आजचा सोमवार असे सलग दोन दिवस शहरातील औरंगपुरा, टीव्ही सेंटर, शिवाजीनगर, त्रिमूर्ती चौक, गजानन मंदिर या परिसरातील बाजारपेठा खरेदीदारांनी फुलून गेल्या आहेत. विशेषत: सोमवारी नरक चतुर्दशी आणि मंगळवारी लक्ष्मीपूजन असल्याने रविवारी बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण होते. यंदा बाजारपेठेतील उलाढाल गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ५० टक्क्यांनी म्हणजेच दीड पटीने वाढल्याचा अंदाज व्यापारी वर्गासह अर्थतज्ञांनी व्यक्त केला आहे. यंदा भरभरून मिळालेला बोनस आणि त्यातच जीएसटीमध्ये झालेल्या कपातीमुळे वस्तूंच्या किमतीत झालेली घट खरेदीदारांचा उत्साह वाढवणारी ठरल्याचे सांगण्यात येते. यंदा महानगरपालिकेने व्यापाऱ्यांना त्यांची दुकाने रात्री बारापर्यंत खुले ठेवण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे मध्यरात्रीपर्यंत खरेदीदारांची गर्दी दुकानात दिसत होती. आणखी किमान तीन दिवस दुकाने अशीच खरेदीदारांनी फुललेली दिसतील, असा विश्वास व्यापारी महासंघाने व्यक्त केला आहे.

सोने-चांदी खरेदीसाठी गर्दी
सोन्याच्या दराने यंदा आकाश गाठले असले तरी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधण्यासाठी अनेकांनी सोने- चांदी खरेदीसाठी सराफा दुकानात गर्दी केली होती. याशिवाय दुचाकी, चारचाकी, मोबाईल, टीव्ही आदी वस्तूंची दुकानेही खरेदीदारांनी फुलून गेली होती. शहरातील टीव्ही सेंटर, औरंगपुरा, पुंडलिकनगर, जिल्हा परिषद परिसर आदी ठिकाणी फटाका बाजार सजलेले आहेत. रविवारी बच्चे कंपनी आपल्या पालकांसह या बाजारांना भेटी देऊन फटाके खरेदीत व्यस्त असल्याचे दिसून आले. शिवाय शहरातील विविध रस्त्यांवर फुलांची दुकाने सजली असून, आर्टिफिशियल फुलांची तोरणे, माळा यांच्या खरेदीची धूम गेल्या दोन दिवसांपासून दिसत आहे.

संगणक, लॅपटॉप खरेदीची धूम
दिवाळीनिमित्त संगणक, लॅपटॉप खरेदीची धूम सुरू आहे. अनेकांनी पाडव्याला लॅपटॉप भेट देण्यासाठी रविवारी आणि आज गर्दी केल्याचे दिसून आले. टीव्ही सेंटर भागातील प्रसिद्ध लॅपट्रिक्स कॉम्‍पुटरचे मालक स्वरुप साळुंखे यांनी सांगितले, की सध्या रिफर्बिश्ड लॅपटॉप घेण्याचा ट्रेंड असून, यामुळे कमी किंमतीत जास्त क्षमतेचा लॅपटॉप घेता येतो. ग्राहकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे आम्‍ही अनेक सवलती जाहीर केल्या आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कारला अचानक आग; महाराणा प्रताप चौकात घबराट

Latest News

कारला अचानक आग; महाराणा प्रताप चौकात घबराट कारला अचानक आग; महाराणा प्रताप चौकात घबराट
छत्रपती संभाजीनगर : बजाजनगरातील महाराणा प्रताप चौकात आज, २४ ऑक्टोबरला दुपारी उभ्या कारला अचानक आग लागल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला....
यवतमाळ हादरले!‌  मैत्रिणीसोबत यात्रोत्सवात आलेल्या १४ वर्षीय मुलीवर पाशवी लैंगिक अत्याचार!!
मुंबईत काचेच्या उंच इमारतीला भीषण आग!; सुदैवाने २७ जण बचावले, १७ जण होरपळले!! 
पतीच्या वागणुकीत कधीतरी बदल होईल, आशेवर जगत होती २४ वर्षीय तरुणी, तो दिवस उजाडलाच नाही, पण त्या दिवशी जे घडलं ते धक्कादायक...छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा पोलिसांनी ६ जणांविरुद्ध केलाय गुन्हा दाखल
हॉटेल चालवायला दिली, तो सर्व साहित्य घेऊन गायब..., हॉटेलमालकाची चिकलठाणा पोलीस ठाण्यात तक्रार
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software