बडोदा बँकेने लाज सोडली!; सिल्लोडमध्ये मुख्यमंत्र्यांचा आदेश डावलून शेतकऱ्यांना कर्जवसुलीच्या नोटिसा!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांकडील कर्जाची वसुली थांबवावी, असे निर्देश बँकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. हे आदेश डावलून बँक ऑफ बडोदाने शेतकऱ्यांना कर्जवसुलीच्या नोटिसा पाठविल्याने संताप व्यक्‍त होत आहे. बँकेच्या उंडणगाव शाखेचा हा प्रताप समोर आला असून, या बँकेच्या अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेतकऱ्यांना बजावलेल्या नोटिसांबद्दल बँक शाखा व्यवस्थापक गजानन बैस यांनी निलाजरेपणाची हद्दच गाठली. ते म्हणाले, की शासनाकडून वसुली थांबविण्याचा लेखी आदेश आम्हाला मिळालेला नाही. त्‍यामुळे नोटिसा वकिलामार्फत पाठवलेल्या आहेत. त्‍यामुळे मुख्यमंत्र्यांनी केवळ तोंडीच आदेश दिले आहेत, का जे बँकांपर्यंत पोहोचले नाहीत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अतिवृष्टीमुळे चिंतित शेतकरी कन्हैय्या बसैये (रा. उंडणगाव) यांनी बडोदा बँकेकडून नोटीस आली आहे. त्‍यांच्या शेतातील मका पीक अतिवृष्टीमुळे वाया गेले असून, कर्जाचा डोंगर आणखीनच वाढला आहे. तो कसा फेडायचा, याची चिंता असताना बँकेने नोटीस पाठवली. थकीत कर्ज, त्‍यावरील व्याज व अन्य खर्च अशी रक्‍कम भरण्याची नोटीस आली आहे. त्‍यामुळे आधीच चिंताग्रस्त शेतकरी हादरून गेला आहे.

दरम्‍यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अतिवृष्टीचे आणखी दोन बळी गेले आहेत.  सिल्लोड तालुक्‍यातील बनकिन्होळा येथे रामेश्वर पुंडलिक फरकाडे (वय ३४) यांनी सोमवारी (६ ऑक्‍टोबर) राहत्‍या घरात गळफास घेतला, तर छत्रपती संभाजीनगर तालुक्‍यातील माळीवाडा येथील जगन्नाथ रखमाजी आढाव (वय ६०) यांनी मंगळवारी (७ ऑक्‍टोबर) विहिरीत उडी घेऊन आत्‍महत्‍या केली. अल्पभूधारक फरकाडे यांच्या सव्वा एकरातील कापूस आणि मका ही पिके अतिवृष्टीने वाया गेली आहेत. त्‍यांच्या पश्चात आई, पत्‍नी, भाऊ, भावजय असा परिवार आहे. दीड वर्षापूर्वीच लग्‍न झाले होते. अल्पभूधारक शेतकरी आढाव यांच्या १ एकर ३७ आर जमिनीतील पिकांचे नुकसान झाले. त्‍यांच्या पश्चात पत्नी, ३ विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software