२ मोठ्या कारवाया : आदर्श पतसंस्था घोटाळा : आजपासून २५ हजार रुपयांपर्यंतच्या ठेवी परत मिळणार; अजिंठा बँक घोटाळा : आणखी ८ जणांना अटक

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या ७५ टक्‍के ठेवीदारांना दिलासा मिळणार असून, २५ हजार रुपयांपर्यंतच्या ठेवी आज, २२ ऑगस्टपासून परत करण्यात येत आहेत. पतसंस्थेतील सुमारे ३५ हजार ठेवीदारांपैकी २६ हजार ५०० ठेवीदारांची २५ हजार रुपयांपर्यंतच्या ठेवी आहेत. २५ हजार रुपयांपर्यंत मुदत ठेव, बचत खाते व पिग्मी खाते असलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या ७५ टक्‍के ठेवीदारांना दिलासा मिळणार असून, २५ हजार रुपयांपर्यंतच्या ठेवी आज, २२ ऑगस्टपासून परत करण्यात येत आहेत. पतसंस्थेतील सुमारे ३५ हजार ठेवीदारांपैकी २६ हजार ५०० ठेवीदारांची २५ हजार रुपयांपर्यंतच्या ठेवी आहेत. २५ हजार रुपयांपर्यंत मुदत ठेव, बचत खाते व पिग्मी खाते असलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत केले जाणार असून, अशा ठेवीदारांनी दोन छायाचित्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खात्याची कागदपत्रे पतसंस्थेच्या एन-६ येथील मुख्य कार्यालयात जमा करण्याचे आवाहन प्रशासक सुरेश काकडे यांनी केले आहे.

यापूर्वी ५२३ खातेधारकांना २० ऑगस्टपर्यंत २६ लाख ४ हजार ३४३ रुपये परत करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले, की पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू असून, ठेवीदारांनी कागदपत्रे सादर करावीत. उर्वरित लिलाव प्रक्रियाही केली जाईल. आम्ही सर्व ठेवीदारांना पैसे परत देण्यास प्रयत्नशील आहोत. जुलैमध्ये दहा ते पंधरा हजार रुपयांपर्यंतच्या ठेवी परत करण्यात आल्या होत्या. संस्थाध्यक्ष, व्यवस्थापक, प्रवर्तक, भागीदार, सदस्य व अन्य व्यक्तींच्या नावे असलेली रक्कम, अन्य मालमत्तांची शासनाकडून जप्ती सुरू आहे. साधारण सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात या लिलाव प्रक्रियेस प्रारंभ होण्याची शक्यता अधिकारीक सूत्रांनी व्यक्‍त केली.

अजिंठा बँक घोटाळा प्रकरणी आणखी ८ अटकेत
अजिंठा अर्बन बँकेतील ९७ कोटी ४१ लाख रुपयांच्या घोटाळाप्रकरणी बुधवारी (२१ ऑगस्ट) दोन व्यवस्थापकांसह ८ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी याबाबतची माहिती दिली. सोपान गोविंदराव डमाळे (वय ६२, रा.जवाहर कॉलनी), मुख्य व्यवस्थापक संदेश भिवसन वाघ (वय ५०, रा. बेगमपुरा), तत्कालीन शाखा व्यवस्थापक कल्याण ज्ञानेश्वर दांगोडे (वय ५०, शहानूरवाडी), प्रशांत भास्कर फळेगावकर (वय ५६, रा. देवानगरी), राजू सावळाराम बाचकर (वय ४६, रा. सदानंदनगर), पोपट बाजीराव साखरे (वय ५३, रा. एन-२ सिडको), ज्ञानेश्वर ऊर्फ शरद सारजाराम पवार (वय ३५, रा. शिवशंकर कॉलनी), गणेश आसाराम दांगोडे (वय ३७, रा. म्हाडा कॉलनी) यांचा बुधवारी अटक केलेल्यांत समावेश आहे. सीईओ प्रदीप कुलकर्णीला २ ऑगस्टला अटक झाली होती. या बँकेतून ३६ कर्जदारांना ६४ कोटी ६० लाखांचे असुरक्षित कर्ज वाटप, ठेवीच्या खोट्या नोंदी, खोटे ताळेबंद व रिझर्व्ह बँकेला खोटा लेखापरीक्षण अहवाल पाठविण्यात आल्याचे समोर आले होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ!

Latest News

State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ! State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ!
बीड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कला केंद्रातील मुलीला अंबाजोगाई येथील साई लॉजवर नेऊन तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली...
State Political News : मीरा-भाईंदरमध्ये महायुतीबाबत सस्पेन्स कायम!, भाजपची ‘७० पार’ची घोषणा अन्‌ शिंदे गटाचा फिफ्टी- फिफ्टी फार्मूला!!
कमावत्या पत्नीला पोटगीचा अधिकार नाही; मुंबई उच्च न्यायालयाने महिलेची याचिका फेटाळली
विभागीय आयुक्‍त कार्यालयासमोर सरपंचपती, ग्रा. पं. अधिकाऱ्याचा राडा!; दोन गटांत हाणामारी, छत्रपती संभाजीनगरची घटना, प्रकरण लातूरचे, सुनावणीसाठी होते छ. संभाजीनगरला...
मिल कॉर्नर हिट ॲन्ड रन; क्रांती चौक पोलिसांनी केला ‘या’ कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software