शेंद्रा MIDC तील लिभेर कंपनीच्या १५ कामगारांना विषबाधा

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शेंद्रा एमआयडीसीतील लिभेर या आंतरराष्ट्रीय कंपनीतील १५ कामगारांना जेवणातील रसगुल्ल्यातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (२० सप्टेंबर) सायंकाळी घडली. बाधित कामगारांना तातडीने कंपनीजवळीलच आदर्श हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सर्व कामगारांची प्रकृती धोक्याबाहेर असून, त्यांना उपचारानंतर घरीही पाठविण्यात आले, अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. लिभेर कंपनीत इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक साहित्याची […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शेंद्रा एमआयडीसीतील लिभेर या आंतरराष्ट्रीय कंपनीतील १५ कामगारांना जेवणातील रसगुल्ल्यातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (२० सप्टेंबर) सायंकाळी घडली. बाधित कामगारांना तातडीने कंपनीजवळीलच आदर्श हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सर्व कामगारांची प्रकृती धोक्याबाहेर असून, त्यांना उपचारानंतर घरीही पाठविण्यात आले, अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

लिभेर कंपनीत इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक साहित्याची निर्मिती केली जाते. दुपारच्या शिफ्टमधील कामगार सायंकाळी सहाच्या सुमारास कँटीनमध्ये नाश्ता करण्यासाठी गेले होते. काहींनी डबादेखील आणला होता. रसगुल्ला खाल्ल्यानंतर काहींना मळमळ, तर काहींना उलट्या होणे सुरू झाले. एकाच वेळी १५ कामगारांना त्रास सुरू झाल्याने त्यांना तत्काळ जवळील आदर्श हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रकृती धोक्याबाहेर असल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती डॉ. आर. बी. पाटील यांनी पत्रकारांना दिली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला...

Latest News

एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला... एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एमजीएमजवळ अंधारात लपून बसलेल्या तिघांनी पोलिसांना पाहून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले...
वाळूज एमआयडीसीतील ऑर्किड इंग्रजी शाळेला गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिली समज, नियमबाह्य फी वसूल करू नका!
‘तुमच्या मुलीला सुखात ठेवीन...’ प्रॉमिसवर सारिकाच्या आईने ठेवला विश्वास, प्रेमविवाहाला भरला होकार, सोपवला मुलीचा हात!; पण पुढे जे घडलं, ते धक्कादायक... छत्रपती संभाजीनगरच्या सिडकोची हृदयद्रावक घटना
अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software