विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विधवा महिलेचे डोक्याचे केस धरून ओढत, धक्काबुक्की करून युवकाने तिची सोन्याची पोत घेऊन पळ काढल्याची घटना वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आली आहे.

किशोर दादाराव साळुंके (रा. धानोरा ता.फुलंब्री) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. २५ वर्षीय विधवा महिलेने या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्यांचे पती ४ वर्षांपूर्वी वारले आहेत. तक्रारीत म्हटले आहे, की गुरुवारी (१५ जानेवारी) दुपारी १ च्या सुमारास ती घरासमोर कपडे धूत असताना किशोर साळुंके तेथे आला. तुला दिलेले व्यवहाराचे माझे पैसे परत का देत नाही, असे म्हणून तो तिला शिवीगाळ करू लागला. महिला त्याला समजावून सांगू लागली, की तुझे पैसे माझ्याकडे नाहीत. तू मला शिवीगाळ करू नको. त्यावर त्याने विधवा महिलेचे डोक्याचे केस धरून ओढले व धक्काबुक्की करून तिच्या गळ्यातील १०० सोन्याचे गोल मनी व एक सोन्याचा पत्ता असलेली साडेसात ग्रॅमची सोन्याची पोत हिसकावून घेऊन जाऊ लागला. यात पोत तुटून त्यामधील १५ मनी जागेवर पडले ते महिलेला सोडले. उर्वरित ६५ हजारांची पोत तो घेऊन गेला, असे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन क्षीरसागर करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

महापालिका स्थायी समिती सभापतिपदी अनिल मकरिये, आज औपचारिक निवड

Latest News

महापालिका स्थायी समिती सभापतिपदी अनिल मकरिये, आज औपचारिक निवड महापालिका स्थायी समिती सभापतिपदी अनिल मकरिये, आज औपचारिक निवड
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिका स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपने अनिल मकरिये यांना बुधवारी (११ मार्च) उमेदवारी जाहीर...
अवघे छत्रपती संभाजीनगर शहरच ‘गॅस’वर!; घरगुती गॅसची कृत्रिम टंचाई, ९२१ रुपयांचा सिलिंडर २ हजार रुपयांनी विकताहेत विक्रेते, प्रशासनाचे दावे फोल, दावे करण्यापेक्षा आता थेट टीम बनवून छापे मारा... शहरवासियांची मागणी!!
हरिभाऊ बागडे यांच्या प्रकृतीत सुधारणा!; रुग्णालयातून डिस्चार्ज
१७ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील घटना
शाळेच्या आवारात १३ वर्षीय विद्यार्थिनीसोबत शिक्षकाचे अश्लील चाळे!; पैठणमधील प्रकाराने खळबळ
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software