रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : रस्ता ओलांडताना भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना रविवारी (१५ मार्च) सकाळी सातच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गावरील भेंडाळा येथे घडली.

कृष्णा रामभाऊ राऊत (वय ४८, रा. कायगाव) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कृष्णा राऊत भेंडाळा येथील एका हॉटेलमध्ये आचारी होते. नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्ग ओलांडत असताना छत्रपती संभाजीनगरकडून येणाऱ्या भरधाव दुचाकीने त्यांना उडवले. त्यांना नागरिकांनी तातडीने गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. दुपारी कायगाव येथील रामेश्वर मंदिर परिसरात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

समृद्धी महामार्गावर आढळला मृतदेह
 समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर शहराजवळील सावंगी इंटरचेंज परिसरात रविवारी (१५ मार्च) पहाटे राजू सुधाकर जिरेकर (रा. भटनगर, दत्तमंदिर परिसर, नारेगाव, छत्रपती संभाजीनगर) यांचा मृतदेह आढळला. त्यांना कोणत्या तरी वाहनाने धडक दिली असावी. त्यात त्यांचा मृत्‍यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. सावंगी इंटरचेंजजवळ चॅनल क्र. ४२१ परिसरात एक व्यक्ती रस्त्यावर पडलेली असल्याची माहिती नागरिकांनी फुलंब्री पोलिसांना दिली. पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी धावले. खिशात सापडलेल्या आधारकार्डवरून ओळख पटली. पोलिसांनी मृतदेह घाटी रुग्णालयात हलविला आहे. अज्ञात वाहनचालकाविरोधात फुलंब्री पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software