जाऊसोबत जवळीक, माझ्याशी करत होता दुरावा; २१ वर्षीय तरुणीचा पतीवर गंभीर आरोप, मुकुंदवाडी पोलिसांत तक्रार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जाऊसोबत प्रेमसंबंध ठेवणारा पती आई-वडील व भावाचे ऐकून माझ्याजवळ येत नव्हता. पत्नी म्हणून वागणूक देत नव्हता, असा गंभीर आरोप २१ वर्षीय विवाहितेने पतीवर केला आहे. मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तिने याबाबत तक्रार दिली असून, त्‍यावरून पोलिसांनी पती, सासू, सासरा व भायाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार तरुणीचे सासर बिजवाडी असून, सध्या […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जाऊसोबत प्रेमसंबंध ठेवणारा पती आई-वडील व भावाचे ऐकून माझ्याजवळ येत नव्हता. पत्नी म्हणून वागणूक देत नव्हता, असा गंभीर आरोप २१ वर्षीय विवाहितेने पतीवर केला आहे. मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तिने याबाबत तक्रार दिली असून, त्‍यावरून पोलिसांनी पती, सासू, सासरा व भायाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार तरुणीचे सासर बिजवाडी असून, सध्या ती मुकुंदवाडी परिसरातील राजनगरात आईकडे वर्षभरापासून राहते. तक्रारीत तिने म्हटले आहे, की २१ एप्रिल २०२२ रोजी तिचा विवाह झाला. तिला पतीपासून एकही अपत्य नाही. लग्नानंतर सुरुवातीचे दोन महिने तिला सासरच्यांनी चांगली वागणूक दिली. नंतर सासू, सासरे व भाया मानसिक त्रास देऊ लागले.

तिच्या नवऱ्याला तिच्याब‌द्दल एकाचे दोन करून सांगायचे. त्यावरून तिचा पती तिला दारू पिऊन येत शिवीगाळ करून मारहाण करायचा. आई-वडील व भावाचे ऐकून तिचा पती तिच्याजवळ येत नव्हता. तिला पत्नी म्हणून वागणूक देत नव्हता. रात्रीच्या वेळी कामावरून उशीरा दारू पिऊन घरी आल्यावर घरी येण्यास का उशीर झाला याबाबत विवाहितेने विचारणा केली की तिला हाताचापटाने मारहाण करून शिवीगाळ करत असे.

सासू, सासरे व भाया हे नेहमी विवाहितेला म्हणायचे की, तुझ्या आई-वडिलांनी म्हणावे तसे लग्न लावून दिले नाही, आम्हाला मानपान दिला नाही. तू हुंडा जास्त घेऊन आली नाही. तुला येथे काही मिळणार नाही, असे म्हणून शिवीगाळ करून मानसिक त्रास देत होते. विवाहितेच्या जाऊसोबत पतीचे प्रेमसंबंध असल्याचे तिला कळल्याने तिने त्याला विचारणा केली असता पतीने तिला शिवीगाळ करून मारहाण केली. याबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली व नांदवण्यास नकार दिला. माहेराहून मोटारसायकल घेण्यासाठी पैसे घेऊन ये तरच तुला आम्ही नांदवू, असे म्हणून घरातून तरुणीला काढून दिल्याचे तक्रारीत म्‍हटले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार इम्तियाज अली इफ्‍तेखार अली खान करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी

Latest News

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यात पुरेसा गॅस उपलब्ध आहे. सध्याच्या गैरफायदा घेण्यासाठी जिल्ह्यात कुणीही गॅसची साठेबाजी करत असेल...
कन्नड, खुलताबाद तालुक्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना ॲड. नीलेश हेलोंढे पाटील यांची सांत्वन भेट
अजिंठा-वेरूळमध्ये चालणार कथित व्हीव्हीआयपींची दादागिरी!, पर्यटकांच्या सुरक्षेसाठीही उचलली कडक पावले!; विभागीय आयुक्तांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना दिले आदेश
हॉटेल व्यावसायिकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणाऱ्या ३८ वर्षीय महिलेने सिडको बसस्थानकावर केला राडा!; हॉटेल व्यावसायिकाला चाकू, काठी, लाथाबुक्क्यांनी मारत होती..., हल्ल्यासाठी पुरुष साथीदाराची घेतली मदत
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software