छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्‍त प्रवीण पवार यांच्या कन्येचा विवाह सोहळा थाटात, सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांनी शरद पवारांचा राखलेला ‘मान’ आला समोर...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण रामराव पवार यांची कन्या प्राजक्ता व उद्योजक प्रशांत निलावर यांचे सुपूत्र हिमांशु यांचा विवाह सोहळा बुधवारी (१२ नोव्‍हेंबर) लोणावळा (जि. पुणे) येथील एका अलिशान हॉटेलमध्ये थाटात पार पडला. या विवाह सोहळ्यात एका प्रसंगाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले, ते म्हणजे, शरद पवार आणि अदाणी हे सोफ्यावर तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाजूच्या खुर्चीवर बसलेले दिसले. त्यांनी शरद पवार यांचा आदर राखल्याचे यातून दिसून आले. कौटुंबिक कार्यक्रमात पदप्रतिष्ठा विसरून सहभागी व्हायचे असते, हेच त्यांनी दाखवून दिले.

582515623_1364127421736575_56615 (1)

सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार, प्रसिद्ध उद्योजक गौतम अदाणी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशीकांत शिंदे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री अतुल सावे, आ. नीलेश राणे, राम कदम, आ. संजय केनेकर, आ. अंबादास दानवे, आ. सतीश चव्हाण, छत्रपती संभाजीनगरचे मनपा आयुक्त जी. श्रीकांत, लोकमत मीडिया समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा यांच्यासह राज्यातील राजकीय व उद्योग क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली. १७ नोव्हेंबरला पुण्यातील एका हॉटेलमध्ये रिसेप्शन होणार आहे.

अदानींवर टीका...
विवाह सोहळ्यात शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी सोफ्यावर बसलेले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाजूच्या खुर्चीवर बसलेले दिसले. यावरून सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. शरद पवारांना मुख्यमंत्र्यांनी आदर दिला तो ठीक आहे, पण गौतम अदानींना हे कळत नाही का, की देवेंद्र फडणवीस हे या राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे प्रथम नागरिक आहेत. अदानींनी त्या पदाचा अपमान केल्याची भावना सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. अदानीला इतर पदांनाही मान द्यायचा असतो हे शिकवलेलं दिसत नाही. गौतम अदानी शासन व्यवस्थेपेक्षा मोठे झाले आहेत का? अदानींना नीट समजावलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया उमटल्या.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ

Latest News

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उसने घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून तिघांनी मिळून स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून...
मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने चिमुकल्यावर चढवला हल्ला, चिमुकला आक्रोश करत असताना आणखी लचके तोडले, बायजीपुऱ्यातील घटनेने महापालिकेप्रती संतापाची लाट, जी. श्रीकांत पाठ थोपटून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांना कामाला लावा, नागरिकांची अपेक्षा
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software