- News
- श्री साई इन्स्टिट्यूटचे फसवणूक प्रकरण : जाधव पिता-पूत्र पोलिसांना सापडेनात, १३३ विद्यार्थ्यांची कोट...
श्री साई इन्स्टिट्यूटचे फसवणूक प्रकरण : जाधव पिता-पूत्र पोलिसांना सापडेनात, १३३ विद्यार्थ्यांची कोट्यवधींना गंडा, २ कर्मचाऱ्यांना पोलीस कोठडी
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : १३३ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १ लाख १० हजार रुपये असा एकूण कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या जे. के. जाधव आणि विक्रांत जाधव या पितापुत्रांना जेरबंद करण्यात अद्याप पोलिसांना यश आलेले नाही. चिकलठाण्यातील श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची संलग्नता नसताना जाधव पिता-पुत्राने प्रवेशाचा बनाव रचला आणि विद्यर्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही केले आहे.
श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटरमध्ये यावर्षीपासूनच एमसीए अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली आहे. प्रथम वर्षासाठी तब्बल १३३ विद्यार्थ्यांनी ‘सीईटी सेल’च्या माध्यमातून प्रत्येकी १ लाख १० हजार रुपये शुल्क भरून प्रवेश घेतला. मात्र परीक्षेसाठी त्यांना बुधवारी रात्रीपर्यंत हॉलतिकीटच मिळाले नव्हते. गुरुवारी सकाळी ते परीक्षा केंद्रावर पोहोचले असता हॉलतिकीट नसल्याने परीक्षेला बसू दिले जात नव्हते. गोंधळून गेलेल्या विद्यार्थ्यांनी कॉलेज गाठले असता कॉलेजचे दरवाजे बंद करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सिडको एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले. विद्यार्थ्यांची अडचण पोलिसांनी गांभीर्याने घेतली. पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्याशी संपर्क साधला. प्रशांत स्वामी यांनी स्वतः विद्यापीठ गाठले. विद्यार्थ्यांनीही विद्यापीठात धाव घेतली. त्यावेळी कॉलेजच्या एमसीए अभ्यासक्रमाला विद्यापीठाची संलग्नताच नसल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले. तसा निर्णयसुद्धा २४ नोव्हेंबरला विद्यापीठाने कॉलेज प्रशासनाला कळवल्याचे सांगण्यात आले. संलग्नता नसतानाही विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेश देऊन जाधव पिता-पुत्राने फसवल्याचे समोर आले. अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी व्याजाने पैसे घेऊन कॉलेजचे शुल्क भरले होते.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
पडेगावच्या कल्पनाचे प्रकरण फसवणूक करण्यापर्यंतच मर्यादित?
By City News Desk
Latest News
06 Dec 2025 09:37:50
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मार्केट सेस रद्द करण्यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीने पुकारलेल्या बंदमध्ये जाधववाडी...

