सिडको एन १२ मध्ये दुबईला गेलेल्या दाम्पत्याचे घर फोडले, रोकड, दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दुबईला गेलेल्या दाम्‍पत्‍याचे घर फोडून चोरट्यांनी रोकड, दागिने आणि अन्य साहित्यासह एकूण १ लाख २१ हजार रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारला. ही घटना गुरुवारी (४ डिसेंबर) दुपारी समोर आली. सिटी चौक पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

अखिल मजीद यार खान (वय ३६, रा. जुबलीपार्क भडकलगेट) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते दुवा फाउंडेशन येथे अकाऊंटट असिस्टंट आहेत. त्यांच्या आत्याचे पती मिन्हाज अहेमद खान अशफाक अहेमद खान (वय ६९) व आत्या सिमा मिन्हाज खान हे दोघे पती - पत्नी सिडको एन १२ येथे राहतात. ते पती-पत्नी ४ ऑक्टोबरला दुबईला त्यांच्या मुलाकडे जातेवेळेस घराला कुलूप लावून चावी स्वतः सोबत घेऊन गेले. गेटची चावी साफसफाई करण्यासाठी सफाई करणाऱ्या बाईकडे दिली होती.

४ डिसेंबरला दुपारी ३ च्या सुमारास सफाई कामवाली बाई वालकंपाऊंडच्या आतील साफसफाई करण्यासाठी आली असता गेटचे लॉक तुटलेले व खाली पडलेले दिसले. तिने आत जाऊन पाहिले असता घराच्या मेन दरवाजाचा लॉक तुटलेला दिसला. तेव्हा तिने शेजारी राहणारे शेख शरीफ यांना बोलावून गेट व घराच्या लॉकबद्दल सांगितले. शेख शरीफ यांनी अखिल यांना फोन करून कळविले. त्यावेळी अखिल हे ऑफिसमधून लगेचच आत्याच्या घरी गेले.

सर्वांनी घरात जाऊन पाहिले असता बेडरूममधील कपाटाचे व ड्रेसिंग टेबलचे लॉक तुटलेले होते. सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. अखिल यांनी लगेचच आत्याला व्हिडीओ कॉल करून माहिती दिली. त्यावेळी आत्याने सांगितले, की कपाटात ८५ हजार रुपये रोख होते. दोन ग्रॅमची सोन्याची कानातील बाळी, दोन ग्रॅमची सोन्याची चैन, १६० ग्रॅमचे चांदीचे नाणे त्यामध्ये पाच ग्रॅम वजनाचे दहा नाणे व दहा ग्रॅम वजनाचे ११ चांदीचे नाणे, सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा सर्व १ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भागवत मुठाळ करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी

Latest News

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यात पुरेसा गॅस उपलब्ध आहे. सध्याच्या गैरफायदा घेण्यासाठी जिल्ह्यात कुणीही गॅसची साठेबाजी करत असेल...
कन्नड, खुलताबाद तालुक्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना ॲड. नीलेश हेलोंढे पाटील यांची सांत्वन भेट
अजिंठा-वेरूळमध्ये चालणार कथित व्हीव्हीआयपींची दादागिरी!, पर्यटकांच्या सुरक्षेसाठीही उचलली कडक पावले!; विभागीय आयुक्तांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना दिले आदेश
हॉटेल व्यावसायिकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणाऱ्या ३८ वर्षीय महिलेने सिडको बसस्थानकावर केला राडा!; हॉटेल व्यावसायिकाला चाकू, काठी, लाथाबुक्क्यांनी मारत होती..., हल्ल्यासाठी पुरुष साथीदाराची घेतली मदत
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software