SRPF जवान ईव्हीएम मशीन बॅगेत भरून नेत असल्याच्या अफवेने खुलताबादमध्ये खळबळ!; रात्रीच शेकडो कार्यकर्ते धावले स्ट्राँग रूमकडे, नंतर समोर आले...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : खुलताबाद नगरपरिषद कार्यालयातील स्ट्राँगरूममधून ईव्हीएम मशीन बॅगेत भरून एसआरपीएफचे जवान दुसरीकडे नेत असल्याच्या अफवेने उमेदवारांनी शेकडो कार्यकर्त्यांसह नगरपरिषद कार्यालयाकडे धाव घेतली. यामुळे गुरुवारी (५ डिसेंबर) मोठाच गोंधळ उडाला. मध्यरात्रीपर्यंत प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

खुलताबाद नगरपरिषद निवडणुकीत विक्रमी ८२.२६ टक्के मतदान झाले आहे. सर्व ईव्हीएम मशीन नगरपरिषद कार्यालयातील स्ट्राँगरूममध्ये राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) कडक बंदोबस्तात ठेवण्यात आल्या आहेत. गुरुवारी रात्री १० ला बंदोबस्तासाठी असलेले जवान अमरावतीला जाण्यासाठी आपले सामान (बॅगा) व्हॅनमध्ये टाकत होते. ते ईव्हीएम मशीन बॅगांत भरून नेत असल्याची अफवा कुणीतरी पसरवली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. विविध पक्षांचे उमेदवार, शेकडो कार्यकर्ते नगरपरिषद कार्यालयासमोर एकवटले.

त्यांनी जवानांना अडवत बॅगा तपासण्याची मागणी केली. जवानांनी कपडे असल्याचे सांगत बॅगा दाखवण्यास नकार दिला. यामुळे ते ईव्हीएम मशीनच बॅगांमध्ये भरून नेत असल्याचा संशय वाढला. खुलताबाद पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेतली. पोलिसांनी जवानांना बॅगा उघडून दाखविण्यास सांगितले. बॅगा उघडल्यावर त्यात ईव्हीएम नसून जवानांचे वैयक्तिक कपडे व साहित्य असल्याचे दिसून आले. या वेळी जवानांनी पोलिसांशीही वाद घातल्याचे प्रत्‍यक्षदर्शींनी सांगितले. न्यायालयाच्या आदेशाने मतमोजणीची तारीख ३ डिसेंबरवरून २१ डिसेंबरवर गेल्याने सध्या उमेदवार चिंतित आहेत. त्यात या अफवेने त्यांच्या पोटात अक्षरशः गोळा आला होता.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

महत्त्वाची बातमी : शेंद्रा ते बिडकीन अन्‌ बिडकीन ते ढोरेगाव... दोन नवे ग्रीनफिल्ड रस्ते वाढवणार इंडस्ट्रियल कनेक्टिव्हिटी, ७४४ कोटी मंजूर

Latest News

महत्त्वाची बातमी : शेंद्रा ते बिडकीन अन्‌ बिडकीन ते ढोरेगाव... दोन नवे ग्रीनफिल्ड रस्ते वाढवणार इंडस्ट्रियल कनेक्टिव्हिटी, ७४४ कोटी मंजूर महत्त्वाची बातमी : शेंद्रा ते बिडकीन अन्‌ बिडकीन ते ढोरेगाव... दोन नवे ग्रीनफिल्ड रस्ते वाढवणार इंडस्ट्रियल कनेक्टिव्हिटी, ७४४ कोटी मंजूर
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : करमाड (शेंद्रा) ते बिडकीन आणि बिडकीन ते ढोरेगाव या नवीन सहापदरी ग्रीनफिल्ड रस्त्यांसाठी सरकारने...
२६ वर्षीय तरुणीवर कारमध्ये जबरदस्ती शरीरसंबंध करण्याचा प्रयत्न!; पुंडलिकनगर परिसरातील धक्कादायक घटना
शेतात गांजाचे पीक, कारवाईसाठी आलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, चिकलठाण्याजवळ रात्रीचा थरार
SRPF जवान ईव्हीएम मशीन बॅगेत भरून नेत असल्याच्या अफवेने खुलताबादमध्ये खळबळ!; रात्रीच शेकडो कार्यकर्ते धावले स्ट्राँग रूमकडे, नंतर समोर आले...
आता मेणबत्त्या नाही, बलात्काऱ्याला पेटवा, छत्रपती संभाजीनगरमध्ये जनतेचा आक्रोश, क्रांतीचौकातून निघाला भव्य मोर्चा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software