भाजपमध्ये जोरदार इनकमिंग!, राजू शिंदे, भरतसिंह राजपूत, सचिन वाणी यांचा भाजपमध्ये प्रवेश

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मनोज सांगळे : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विधानसभा निवडणुकीत भाजपमधून ठाकरे गटात जात सुरेश बनकर, डॉ. दिनेश परदेशी, राजू शिंदे यांनी अनुक्रमे सिल्लोड, वैजापूर आणि छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवली. तिघेही पराभूत झाले. त्यानंतर बनकर, परदेशी यांनी भाजपात घरवापसी केली, मात्र राजू शिंदे यांना शहरातील पदाधिकाऱ्यांचा विरोध असल्याने त्यांच्या परतीचे दार उघडण्यात आले नव्हते. रविवारी (१६ नोव्हेंबर) त्यांचा भाजप प्रवेश होईल, असे सांगण्यात येत होते. काही कारणास्तव तो होऊ शकला नाही. त्यांच्या प्रवेशाला विरोध असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र आज, १८ नोव्‍हेंबरला मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात अखेर राजू शिंदे यांचे गंगेत घोडे न्हाले आहेत.

मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार डॉ. भागवत कराड, प्रदेश महामंत्री आ. संजय केनेकर, जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे, शिरिषा बोराळकर यांच्या उपस्थितीत राजू शिंदे यांना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश दिला आहे. या वेळी शिंदे यांच्यासोबत माजी नगरसेवक प्रकाश गायकवाड, माजी नगरसेवक गोकुळ मलके, पंचायत समितीचे सदस्य सतीश पाटील, कैलास वाणी, अजय शिंदे, युवराज भालेराव, गोरख देहाडे, संदीप शिंदे, अभिजित पाटील यांनीही प्रवेश केला. दरम्यान, ग्रामीण भागातूनही भाजपमध्ये जोरदार इनकमिंग झाले. यात शिवसेनेचे माजी जिल्हा संघटक भरतसिंह राजपूत यांच्यासह ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख नितीन राठोड, काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी समाज कल्याण सभापती धनराज बेडवाल, काँग्रेसचे माजी सोयगाव तालुकाध्यक्ष धनराज भास्कर पाटील, कृषी व ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश शिवाजीराव पाटील, शिवसेना वैजापूर तालुकाप्रमुख सचिन वाणी, शिवसेना शहरप्रमुख प्रकाश चव्हाण, नंदू जाधव, वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देविदास वाणी, माजी नगरसेवक लिमेश वाणी, अनिल नावले, शहर सेना प्रमुख राहुल साळुंखे, रवींद्र मंडळ, संदिप त्रिभुवन, स्वप्नील दहिभाते, रामभाऊ पेरकर, राहुल निकम, अनिल वाणी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजप मजबूत स्थितीत...
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर ग्रामीण भागातून ठाकरे गट, शिंदे गट आणि अन्य पक्षांतून भाजपमध्ये पदाधिकाऱ्यांचे झालेले इनकमिंग भाजपला मजबूत स्थितीत घेऊन आले आहे. काही दिवसांपूर्वी शिंदे गटाने भाजपचे पदाधिकारी फोडले होते. आज भाजपने हिशेब बरोबर केला. राजू शिंदे यांचा भाजप प्रवेश होऊ नये म्हणून शहरातील पदाधिकाऱ्यांनी बरेच प्रयत्न केले. मात्र उपयोग झाला नाही. आता त्यांनी आगामी निवडणुकांत भाजपच्या यशासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली आहे. महापौरही भाजपाचाच करणार, हे ठामपणे सांगितले आहे. मंत्री संजय शिरसाट यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणाऱ्या राजू शिंदे यांनी गेल्या १ एप्रिलला ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली होती. राजीनाम्‍यात त्‍यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर खापर फोडले होते. राजू शिंदे यांच्याकडे पक्षाचे विधानसभा प्रमुख हे पद होते. अंबादास दानवे यांनी त्यांना ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटात आणले होते. त्‍यांना उमेदवारी मिळवून देण्यातही त्‍यांचाच वाटा होता. अटीतटीच्या लढतीत अवघ्या १६ हजार मतांनी राजू शिंदे यांचा पराभ झाला होता. त्‍यांनी १ लाख मते घेतली होती. आगामी महापालिका निवडणुकीत राजू शिंदे यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

औरंजेबाची कबर जेसीबीने उखडून फेका, तिथे मुत्रालय बांधा : छत्रपती संभाजीनगरातील सभेत टी. राजासिंह कडाडले!;

Latest News

औरंजेबाची कबर जेसीबीने उखडून फेका, तिथे मुत्रालय बांधा : छत्रपती संभाजीनगरातील सभेत टी. राजासिंह कडाडले!; औरंजेबाची कबर जेसीबीने उखडून फेका, तिथे मुत्रालय बांधा : छत्रपती संभाजीनगरातील सभेत टी. राजासिंह कडाडले!;
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जब जब हिंदू बटा है, तब तब हिंदू कटा है, असे सांगत श्रीराम युवा...
मोठी कारवाई : फुलंब्री शहरात ६ गायींची कत्तल, ८ गायींना वाचवले!; छत्रपती संभाजीनगरहून पोलिसांची टीम गेली, फुलंब्री पोलिसांना दाखवला ‘आरसा’!!
भररस्त्यात उभी केली क्रूझर, पोलिसांना म्हणाला, "हम नगरसेवक पठाण के लोगा, सबकी वर्दी उतरवा दूँगा...’, हर्सूल टी पॉइंटवर दोघांनी कहरच केला..! 
दरवाढ, युद्धाचे सावट, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरही छत्रपती संभाजीनगरच्या सराफा बाजारात मंदी
मळणीयंत्रात अडकून ३० वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, उंडणगाव शिवारातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software