१६ नोव्हेंबरच्या मुहूर्तावर राजू शिंदे यांची भाजपमध्ये होणार घरवापसी!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : वैजापूरमध्ये आ. रमेश बोरनारे यांनी भाजप फोडून स्थानिक पदाधिकाऱ्यांना शिंदे गटात घ्यायला सुरुवात केली आहे, दुसरीकडे सिल्‍लोडमध्ये आ. अब्दुल सत्तार यांनी नगरपालिका निवडणुकीत भाजपला सोबत न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही आता एक पाऊल पुढे टाकत मंत्री संजय शिरसाटांना विधानसभा निवडणुकीत आव्हान देणाऱ्या राजू शिंदे यांना पुन्हा पक्षात प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. १६ नोव्हेंबरला राजू शिंदे हे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत घरवापसी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम मतदारसंघाची जागा शिंदे गटाला सुटल्याने भाजपच्या राजू शिंदे यांनी ठाकरे गटात प्रवेश करत उमेदवारी मिळवली होती. संजय शिरसाट यांना आव्हान देत ते मैदानात उतरले होते. मात्र त्यांचा पराभव झाला होता. राजू शिंदे यांच्यासोबत सिल्लोडमध्ये सुरेश बनकर, वैजापूरमध्ये दिनेश परदेशी यांनीही ऐन निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारीसाठी भाजप सोडून ठाकरे गट गाठला होता.

उमेदवारीही मिळवली होती. मात्र तिघांचाही पराभव झाल्याने यापूर्वीच बनकर आणि परदेशी हे भाजपमध्ये परतले आहेत. राजू शिंदे यांना परत घेण्यास मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध होता, असे सांगण्यात येते. मात्र अलीकडच्या काळात शिंदे गटाचे आमदार ज्या पद्धतीने भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी वागत आहेत, एव्हाना थेट काही पदाधिकारीच फोडून शिंदे गटात घेत आहेत, ते पाहता स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही राजू शिंदे यांना विरोध कमी केला आहे. यामुळे राजू शिंदे यांचा भाजपमध्ये परतण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे. एका वृत्तपत्राशी बोलताना राजू शिंदे यांनी आपल्या संभाव्य भाजप प्रवेशाला दुजोराही दिला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना

Latest News

सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
वैजापूर/पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सत्यनारायणाच्या पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून अपघात झाला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी...
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
शिंदे गटाला सोबत घ्यावेच लागणार, पण ‘अटींचा’ भडीमार नको म्हणून भाजपच्या खेळ्या सुरू..., शहर-जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे काय म्हणाले...
२० वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून वारंवार लैंगिक अत्याचार, वाळूज MIDC तील रांजणगाव शेणपुंजीची घटना
शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगसेवकांनी पराभूत भाजप उमेदवाराच्या घरासमोर नाचवली तलवार!, विजयी रॅलीदरम्यान प्रभाग १८ मधील धक्कादायक प्रकार
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software