दुसऱ्याच्या प्रचारात बाधा आणाल तर भररस्‍त्‍यात प्रसाद देऊ; पोलीस आयुक्‍त प्रवीण पवार यांनी उमेदवारांना बजावले!, संवेदनशील परिसरातील उमेदवारांची घेतली बैठक

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापलिका निवडणुकीत कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवा. कोणीही कायदा हातात घेऊन समाज अस्थिर करू नका. माझ्या प्रभागात प्रचारासाठी यायचे नाही अशी दमदाटी किंवा दादागिरी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. जिन्सी आणि मील कॉर्नर येथे राडा करणाऱ्यांचा योग्य पाहुणचार केला असून, गरज पडल्यास भररस्‍त्‍यात प्रसाद देण्यास पोलीस मागेपुढे पाहणार नाहीत, अशी सक्त ताकीद पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांना दिली आहे.

पोलीस आयुक्तालयात शनिवारी (१० जानेवारी) सर्वपक्षीय उमेदवारांची बैठक घेण्यात आली. पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, रत्नकुमार नवले, प्रशांत स्वामी, शर्मिष्ठा भोसले, सहायक पोलीस आयुक्‍त अशोक राजपूत, यांची उपस्थिती होती. बैठकीला क्रांती चौक, सिटी चौक, जिन्सी, बेगमपुरा भागातील ९५ उमेदवार उपस्थित होते. उमेदवारांसोबत पोलीस आयुक्‍तांनी संवाद साधला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पोलीस आयुक्‍त प्रवीण पवार म्हणाले, की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रचार करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कोणीही विरोधकांच्या प्रचारात बाधा आणू नका. निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडतील, असे आश्वासन पोलीस आयुक्‍तांनी दिले. कुठेही अनुचित प्रकार घडत असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त रत्नकुमार नवले यांनी केले. सोशल मीडियावर सुरू असलेल्या प्रचाराबाबतही पोलिसांनी उमेदवारांना बजावले. २४ तास सायबर पेट्रोलिंग सुरू असून, १५ दिवसांत २२९ वादग्रस्त पोस्ट डिलीट केल्याची माहिती दिली. २२ जणांना नोटीस बजावत संयमी शब्दांसह प्रचार करण्याची सूचना देण्यात आली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

औरंजेबाची कबर जेसीबीने उखडून फेका, तिथे मुत्रालय बांधा : छत्रपती संभाजीनगरातील सभेत टी. राजासिंह कडाडले!;

Latest News

औरंजेबाची कबर जेसीबीने उखडून फेका, तिथे मुत्रालय बांधा : छत्रपती संभाजीनगरातील सभेत टी. राजासिंह कडाडले!; औरंजेबाची कबर जेसीबीने उखडून फेका, तिथे मुत्रालय बांधा : छत्रपती संभाजीनगरातील सभेत टी. राजासिंह कडाडले!;
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जब जब हिंदू बटा है, तब तब हिंदू कटा है, असे सांगत श्रीराम युवा...
मोठी कारवाई : फुलंब्री शहरात ६ गायींची कत्तल, ८ गायींना वाचवले!; छत्रपती संभाजीनगरहून पोलिसांची टीम गेली, फुलंब्री पोलिसांना दाखवला ‘आरसा’!!
भररस्त्यात उभी केली क्रूझर, पोलिसांना म्हणाला, "हम नगरसेवक पठाण के लोगा, सबकी वर्दी उतरवा दूँगा...’, हर्सूल टी पॉइंटवर दोघांनी कहरच केला..! 
दरवाढ, युद्धाचे सावट, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरही छत्रपती संभाजीनगरच्या सराफा बाजारात मंदी
मळणीयंत्रात अडकून ३० वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, उंडणगाव शिवारातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software