टीव्ही सेंटर चौकात दोन टवाळखोरांची पोलिसाला बेदम मारहाण, चाकूचे वार करून केले रक्तबंबाळ, पोलीस आहे तर काय झालं... म्हणत सुरू होता धिंगाणा

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : टीव्ही सेंटर चौकात एका पोलीस अंमलदाराला दोन टवाळखोरांनी क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण केली. पोलीस आहे तर काय झालं, असं म्हणत दोघांनी धिंगाणा सुरू ठेवत चाकूचे वार पोलिसावर केले. पोलीस रक्तबंबाळ झाल्यानंतर दोघे पळून गेले. सिडको पोलिसांनी दोन्ही टवाळखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी (३ मार्च) दुपारी तीनच्या सुमारास घडली.

नीलेश विलास सदभावे (वय ३०, रा. मूळ गाव भिलपल्टन गल्ली, कन्नड ह.मु. फिर्दोस गार्डन, पडेगाव) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते पत्नीसह राहतात. छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस ठाण्यात अंमलदार आहेत. मंगळवारी (३ मार्च) दुपारी अडीचच्या सुमारास ते त्यांचे भावजी विशाल विक्रम कुलथे यांना टीव्ही सेंटर चौकातील वैशाली पान सेंटर दुकानात भेटण्यासाठी आले. चौकातीलच हातगाडीवर बिर्याणी घेऊन ते खात असताना दोन अनोळखी व्यक्ती आले, त्यापैकी एकाने सदभावे यांच्याजवळील पाण्याचा ग्लास मागितला. सदभावे यांनी त्यांना पाण्याचा ग्लास देण्यास नकार दिला असता त्याने धक्काबुक्की करून शिवीगाळ करून हाताचापटाने मारहाण केली.

सदभावे यांनी त्याचा प्रतिकार केला असता त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीने सुध्दा सदभावे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. भांडण चालू असताना लोकांची गर्दी झाली. गर्दीमधील लोक त्यांची नावे अक्षय सुरडकर ऊर्फ अक्षय बाँड व सागर साळवे उर्फ भुऱ्या (रा. सिध्दार्थनगर) असल्याचे म्हणत होते. मारहाण करत असताना लोक त्यांना सांगत होते, की तुम्ही ज्याला मारहाण करत आहे ते पोलीस आहेत. त्यावर सागर उर्फ भुऱ्या म्हणाला, की पोलीस आहे तर काय झालं... त्याला माहीत नाही का आम्ही कोण आहे, असे म्हणून त्याने जवळील धारदार चाकूने सदभावे यांच्या पोटावर, डाव्या बरगडीवर व पाठीवर मारून गंभीर जखमी केले.

सदभावे हे रक्तबंबाळ झाले. त्यानंतर दोघे पळून जाऊ लागले. जाताना त्यांनी तू जर आमच्या विरोधात तक्रार दिली व परत येथे आलास तर तुला जीवे मारू, अशी धमकी दिली. त्यानंतर सदभावे यांचे भावजी तिथे आले. त्यांनी सदभावे यांना प्राथमिक उपचार कामी सिध्दी विनायक हॉस्पिटल जाधववाडी येथे दाखविले. त्यानंतर ते घाटी रुग्णालयात दाखल झाले. अधिक तपास पोलीस अंमलदार अनिल पवार करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बुढीलेनमध्ये क्षुल्लक कारणावरून जमाव जमला, नक्की काय घडलं, ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest News

बुढीलेनमध्ये क्षुल्लक कारणावरून जमाव जमला, नक्की काय घडलं, ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल बुढीलेनमध्ये क्षुल्लक कारणावरून जमाव जमला, नक्की काय घडलं, ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मोटारसायकल अपघाताच्या किरकोळ कारणावरून सिटी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुढीलाइन भागात दोन गट भिडले....
मंत्री शिरसाटांच्या कन्या-पुत्राला स्थायी समितीतून का डावलले?
माझ्यावर आधी ३०७, आता ३०२ करून टाकीन... चाकूचे सपासप वार करत गल्लीगुंडाने धमकावले!; बेगमपुरा भागातील घटना
टीव्ही सेंटर चौकात दोन टवाळखोरांची पोलिसाला बेदम मारहाण, चाकूचे वार करून केले रक्तबंबाळ, पोलीस आहे तर काय झालं... म्हणत सुरू होता धिंगाणा
नाथषष्ठी यात्रेमुळे पैठणकडे जाणाऱ्या जड वाहतूक मार्गात मोठा बदल, SP डॉ. राठोड यांनी काढले आदेश
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software