महायुतीमुळे अनेकांचे राजकीय बळी जाणार! ; आज दुपारनंतर महायुतीची घोषणा होणार?

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक महायुतीतच लढण्याचा निर्णय जवळपास अंतिम टप्प्यावर आला असून, आज, २५ डिसेंबरच्या दुपारनंतर या निर्णयाची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र असे झाले तर अनेकांचे राजकीय बळी जाणार आहेत. बुधवारी (२४ डिसेंबर) भाजप मंत्री अतुल सावे यांनी बोलताना आम्ही दोन पावले मागे आलो, शिंदे गटाने दोन पावले मागे यावे, असे म्हटले आहे. गुरुवारी दुपारपर्यंत सर्व फायनल होईल, असे ते म्हणाले.

निवडणूक महायुतीतच लढायची, असे निर्देश वरिष्ठ स्तरावरून आहेत. त्यामुळे मंत्री अतुल सावे आणि शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांची सर्व गणिते जुळवताना फरपट होत असल्याचे दिसून येते. भाजपच्या कोअर कमिटीने बुधवारी सायंकाळी चिकलठाणा येथील पक्षाच्या विभागीय कार्यालयात चार तास यावर काथ्याकूट केला त्यानंतर सावे यांनी महायुतीबद्दल भूमिका जाहीर केली. शिंदे गटासोबत फरपट होऊ नये, सोबतच मतविभाजन होणार नाही, याचीही काळजी त्यांना आहे.

सुरुवातीपासून आम्ही भूमिका सकारात्मक असल्याचे सावे म्हणाले. गेले दोन दिवस भाजप-शिंदे गटात युतीबद्दल चर्चा झालेली नाही. तीन दिवसांपूर्वी रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीत ५० टक्‍के जागांवर तोडगा निघाल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, कोअर कमिटी सदस्य शिरीष बोराळकर यांनी सांगितले, की हिंदू मतांची विभागणी होऊ नये म्हणून युती करायची आहे. भाजपप्रमाणेच शिंदे गटानेही समजदारीची भूमिका घ्यावी.

अनेकांचे राजकीय बळी जाणार...
प्रत्येक प्रभागातून भाजप आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका निवडणुकीची तयारी केली आहे. महायुती झाल्यास पक्षाचे तिकीट मिळणार नसल्याने अनेकांचा हिरमोड होणार आहे. गेल्या काही दिवसांत भाजप, शिंदे गटात अनेकांनी प्रवेश केला आहे. तेही नगरसेवकपदाचे तिकीट मिळणार असल्याच्याच आमिषाने आले आहेत. त्यामुळे आधीच इच्‍छुक, त्यात पडलेली भर यामुळे तिकीट वाटप करताना दोन्ही पक्षांची चांगलीच गोची होणार आहे. अनेकांनी तर प्लॅन बी तयार ठेवला आहे. भाजप, शिंदे गटाकडून तिकीट मिळाले नाही तर ठाकरे गट किंवा अन्य पक्षांकडून तिकीट मिळविण्याची तयारी त्यांनी केली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण

Latest News

मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना गुरुवारी (१२ मार्च) दुपारी १ च्या...
वेळीच एअरबॅग उघडल्याने वाचले मुख्याध्यापक देविदास चितळे, नियंत्रण सुटून कार २० फूट खोल चारीत कोसळली!, फुलंब्रीजवळील दुर्घटना
सिडको बसस्थानकावर नाश्ता सेंटरचालकावर चौघांचा हल्ला, जुन्या भांडणावरून रिक्षाचालकाची खुन्नस, दोघे जखमी
करमाडजवळील दुर्घटना : दुभाजकावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू; मागून येणाऱ्या वाहनाने हूल दिली...
१७ वर्षीय मुलीची राहत्या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या, कन्नड तालुक्यातील धक्कादायक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software