सिडको बसस्थानकावर नाश्ता सेंटरचालकावर चौघांचा हल्ला, जुन्या भांडणावरून रिक्षाचालकाची खुन्नस, दोघे जखमी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिडको बसस्थानकाजवळील नाश्ता सेंटरवर काम करणाऱ्या २ तरुणांवर जुन्या भांडणाच्या कारणावरून रिक्षाचालकासह चौघांनी हल्ला केला. चाकूने, दगडाने डोक्यात मारून जखमी केले. ही घटना बुधवारी (११ मार्च) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. सिडको एमआयडीसी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आकाश लक्ष्मण शिंदे (वय २६, रा. पिसादेवी रोड, श्रीकृष्णनगर) याने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तो ओमसाई नाश्ता सेंटर, सिडको बसस्टँड येथे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. बुधवारी (११ मार्च) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गिऱ्हाइकाला नाश्ता देत असताना रिक्षाचालक शेख युसूफ शेख उस्मान (वय ५०) हा त्याची रिक्षा (क्र. एमएच २०, डीसी २९०१) घेऊन सिडको बसस्टँडच्या पार्किंगजवळ उभा होता. त्याच्याकडे तीन अनोळखी व्यक्ती मोटारसायकलीवरून आले. त्यानंतर चौघे मिळून आकाश शिंदेकडे आले. युसूफने जुन्या भांडणाच्या कारणावरून आकाशला हाताचापटाने मारहाण सुरू केली.

त्याच्या ३ साथीदारांनीही आकाशवर हल्ला केला. युसूफने हॉटलची खुर्ची उचलून हातावर मारली, तर दुसऱ्याने खिशातील चाकू काढून आकाशच्या डोक्यात मारला. आकाश जखमी होऊन कोसळला. त्यानंतर सर्वांनी लाथाबुक्क्याने मारहाण सुरू केली. हॉटेलमध्ये आकाशसोबत काम करणाऱ्या यश अशोक कोल्हे याने आकाशला वाचविण्याचा प्रयत्‍न केला असता त्यालाही दगड मारून जखमी करण्यात आले. नंतर युसूफ व त्याचे ३ साथीदार पळून गेले. मिनी घाटी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर आकाश व यशने सिडको एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी शेख युसूफसह त्याच्या ३ साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार सुभाष पवार करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण

Latest News

मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना गुरुवारी (१२ मार्च) दुपारी १ च्या...
वेळीच एअरबॅग उघडल्याने वाचले मुख्याध्यापक देविदास चितळे, नियंत्रण सुटून कार २० फूट खोल चारीत कोसळली!, फुलंब्रीजवळील दुर्घटना
सिडको बसस्थानकावर नाश्ता सेंटरचालकावर चौघांचा हल्ला, जुन्या भांडणावरून रिक्षाचालकाची खुन्नस, दोघे जखमी
करमाडजवळील दुर्घटना : दुभाजकावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू; मागून येणाऱ्या वाहनाने हूल दिली...
१७ वर्षीय मुलीची राहत्या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या, कन्नड तालुक्यातील धक्कादायक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software