समोर पोलीस चेकिंग सुरू आहे म्हणत दोन भामट्यांचा वृद्धाला गंडा!; २ तोळ्यांची सोनसाखळी घेऊन पसार...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : समोर पोलीस चेकिंग सुरू असल्याची बतावणी करून ६३ वर्षीय व्यापाऱ्याच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोनसाखळी दोन भामट्यांनी काढून घेतली आणि पोबारा केला. ही धक्कादायक घटना वाळूज महानगरमध्ये शुक्रवारी (१३ मार्च) दुपारी १ च्या सुमारास घडली.

सूत्रांच्या माहितीनुसार, बन्सीलाल संपतलाल भन्साळी (वय ६३, रा. ए. एस. क्लबजवळ, सिडको वाळूज महानगर-१) व्यापारी असून ते घरातून दुचाकीने कामानिमित्ताने बाहेर पडले. छत्रपती संभाजीनगर - अहिल्यानगर मार्गावरील सिडको वाळूज महानगर-१ प्रवेशद्वाराजवळ आले असता दोन भामट्यांनी त्यांना थांबवले. समोर पोलीस चेकिंग सुरू असल्याचे सांगत भन्साळी यांच्या समोरच एकमेकांपैकी एकाला दम देत मारहाण केल्याचा आव आणला. हा प्रकार पाहून भन्साळी घाबरले. त्यानंतर भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी काढून ठेवण्यास सांगितले.

भन्साळी यांनी सोनसाखळी काढल्यानंतर ती खिशात न ठेवता दुचाकीच्या डिक्कीत ठेवायला भामट्यांनी सांगितले. त्यानंतर मी ठेवतो, असे म्हणत हातचलाखी करून साखळी असलेली पुडी बदलली आणि त्यांच्या हातात दगड बांधलेली पुडी देऊन भामट्यांनी पोबारा केला. भन्साळी यांनी काही वेळाने पुडी उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये दगड असल्याचे दिसले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच भन्साळी यांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. नागरिकांनी अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नये तसेच अशा संशयास्पद प्रकारांची तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल...

Latest News

Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल... Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल...
हिंदू धर्मात गाय पवित्र मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार, घरात गायीची मूर्ती ठेवल्याने आजूबाजूच्या वातावरणावर सकारात्मक परिणाम होतो. असे मानले जाते की...
इंडक्शन कुकर किंवा सिलिंडर मिळत नसेल, तर कमी किमतीत तुमचे जेवण शिजवण्यासाठी वापरा हे गॅझेट्स...
समोर पोलीस चेकिंग सुरू आहे म्हणत दोन भामट्यांचा वृद्धाला गंडा!; २ तोळ्यांची सोनसाखळी घेऊन पसार...
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या
प्रेम प्रकरणात मदत करत असल्याच्या संशयावरून तरुणावर लोखंडी रॉड, बेल्टने बेदम मारहाण, रोहिदासपुऱ्यातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software