१७ वर्षीय मुलीची राहत्या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या, कन्नड तालुक्यातील धक्कादायक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

कन्नड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. ही धक्कादायक घटना मुंगसापूर (ता. कन्नड) येथे शुक्रवारी (१३ मार्च) दुपारी घडली. आशा शिवाजी पवार असे आत्‍महत्‍या केलेल्या मुलीचे नाव आहे.

आशा बारावीपर्यंत शिकलेली होती. वर्षभरापासून शिक्षण सोडून आई-वडिलांसोबत शेतात मोलमजुरी करायची. शुक्रवारी सकाळी कुटुंबातील सर्व सदस्य शेतात कामासाठी गेले होते. प्रकृती ठिक नसल्याने आशा घरीच थांबली होती. सायंकाळी ५ च्या सुमारास तिचा भाऊ प्रसाद घरी परतला असता आशाने गळफास घेतल्याचे दिसले. त्याने हंबरडा फोडला. शेजाऱ्यांनी धाव घेऊन तिला औराळा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले.

मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. जयदीप झगरे यांनी तिला तपासून मृत घोषित केले. रात्री उशिरा उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. कन्नड ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून आत्‍महत्‍येचे कारण शोधायला सुरुवात केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार यांनी सहकाऱ्यांसह घटनास्‍थळी पाहणीही केली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण

Latest News

मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना गुरुवारी (१२ मार्च) दुपारी १ च्या...
वेळीच एअरबॅग उघडल्याने वाचले मुख्याध्यापक देविदास चितळे, नियंत्रण सुटून कार २० फूट खोल चारीत कोसळली!, फुलंब्रीजवळील दुर्घटना
सिडको बसस्थानकावर नाश्ता सेंटरचालकावर चौघांचा हल्ला, जुन्या भांडणावरून रिक्षाचालकाची खुन्नस, दोघे जखमी
करमाडजवळील दुर्घटना : दुभाजकावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू; मागून येणाऱ्या वाहनाने हूल दिली...
१७ वर्षीय मुलीची राहत्या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या, कन्नड तालुक्यातील धक्कादायक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software