- News
- सिटी क्राईम
- घर का भेदी... मनपा रुग्णालयाचा कंत्राटी कर्मचारीच गर्भपाताच्या रॅकेटमध्ये सक्रीय!; सिडको MIDC पोलिसा...
घर का भेदी... मनपा रुग्णालयाचा कंत्राटी कर्मचारीच गर्भपाताच्या रॅकेटमध्ये सक्रीय!; सिडको MIDC पोलिसांनी केली अटक, टोळीप्रमुख डॉ. सोनवणे अद्याप फरारीच
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध गर्भपात रॅकेट चालवणाऱ्या टोळीची पाळेमुळे खोदणे सध्या सिडको एमआयडीसी पोलिसांकडून सुरू आहे. शनिवारी (१४ मार्च) महापालिका रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी शंकर आढाव (वय २७) याला अटक केली आहे. तो महापालिका रुग्णालयात नियमित तपासणीसाठी येणाऱ्या गर्भवती महिलांची माहिती पुरवायचा, गर्भवती किंवा तिच्या कुटुंबाला गर्भलिंगनिदानाबाबत विचारणा करायचा. कुटुंब तयार झाले, की टोळीप्रमुख डॉ. संतोष सोनवणेशी संपर्क घडवून आणायचा...
डॉ. सोनवणेच्या संपर्कात अरबाज सय्यद कसा आला, हेही चौकशीतून समोर आले आहे. तो आपल्या २६ वर्षीय गर्भवती पत्नीला नियमित चाचणीसाठी नारेगावच्या मनपा रुग्णालयात घेऊन जायचा. तेथे कंत्राटी कर्मचारी शंकरसोबत त्याची ओळख झाली. दोघांमध्ये गर्भलिंगनिदानाबाबत चर्चा झाली. शंकरने पुढाकार घेत त्याला त्यासाठी महालॅब चालक अनिल जाधवला भेटवले. त्यानंतर अरबाजचा संपर्क डॉ. सोनवणेशी करून देण्यात आला. शंकरच या कृत्याची मूळ कडी असल्याचे समोर येताच त्याला सहायक पोलिस निरीक्षक कैलास लहाने यांनी अटक केली. अनिल जाधव (सपकाळ) याच्या पत्नीला या महालॅबचे कंत्राट मिळाले आहे. मात्र, त्याची सर्व कामे अनिलच करतो. मनपाच्या नारेगावच्या रुग्णालयातील चाचणीचे कामही जाधवच्या पत्नीच्या लॅबकडेच होते. अनिलने शंकरला गर्भवती महिलांची माहिती देणे, गर्भलिंगनिदानासाठी विचारणा करून तयार करणे अशी कामे सोपवली होती. या कामासाठी शंकरला टक्केवारीवर पैसे मिळायचे.
म्होरक्या अन् टोळी अद्याप फरारीच...
टोळीप्रमुख डॉ. संतोष सोनवणेसह लॅबचालक अनिल जाधव, परिचारिका कमळ तिनगोटे अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. अनिलची लॅब बंद आहे. पोलीस संतोष सोनवणेच्या नातेवाइकांकडून त्याच तपास करण्याचा प्रयत्न करत आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
15 Mar 2026 10:44:18
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना गुरुवारी (१२ मार्च) दुपारी १ च्या...

