मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना गुरुवारी (१२ मार्च) दुपारी १ च्या सुमारास घडली. मुलीच्या आईने सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून पोलिसांनी अज्ञात अपहरणकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला आहे.

गुरुवारी दुपारी १२ ला मोठ्या बहिणीकडे जात असल्याचे आईला सांगून मुलगी घराबाहेर पडली. तिची मोठी बहीण समोरच्याच गल्लीत राहत असल्याने आईने एकटे जाऊ दिले. दुपारी १ ला घरातील काम आवरून मुलीची आईसुद्धा तिथे गेली असता छोटी मुलगी तिथे आली नसल्याचे कळले. त्यांनी मोठ्या मुलीला विचारले असता तिने छोटी माझ्याकडे आलीच नाही, असे उत्तर दिले. तिचा फोनही बंद येत होता. मुलीच्या आईने तिचा आजूबाजूला, शेजारी व नातेवाइकांकडे शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. तिचे कुणीतरी अपहरण केल्याची शक्यता सिडको पोलिसांत दिलेल्या तक्रारीत व्यक्त करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार एकनाथ चव्हाण करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण

Latest News

मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना गुरुवारी (१२ मार्च) दुपारी १ च्या...
वेळीच एअरबॅग उघडल्याने वाचले मुख्याध्यापक देविदास चितळे, नियंत्रण सुटून कार २० फूट खोल चारीत कोसळली!, फुलंब्रीजवळील दुर्घटना
सिडको बसस्थानकावर नाश्ता सेंटरचालकावर चौघांचा हल्ला, जुन्या भांडणावरून रिक्षाचालकाची खुन्नस, दोघे जखमी
करमाडजवळील दुर्घटना : दुभाजकावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू; मागून येणाऱ्या वाहनाने हूल दिली...
१७ वर्षीय मुलीची राहत्या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या, कन्नड तालुक्यातील धक्कादायक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software