- News
- पॉलिटिक्स
- यूपीतील बुलडोझर राज इथे चालू देणार नाही, आ. पठाण यांचा मनपा आयुक्तांना इशारा, मंत्री शिरसाट म्हणाले,...
यूपीतील बुलडोझर राज इथे चालू देणार नाही, आ. पठाण यांचा मनपा आयुक्तांना इशारा, मंत्री शिरसाट म्हणाले, इथे येऊन जातीय तणाव वाढवू नका, कारवाई करू...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पैठण गेटजवळ युवकाच्या हत्येनंतर महापालिकेने आक्रमक होत परिसरातील अतिक्रमणांवर बुलडोझर चालवला. या प्रकरणात एमआयएमची कोणतीही भूमिका दिसून आली नाही. मात्र काँग्रेसने महापालिकेच्या कारवाईविरोधात भूमिका घेतली असून, शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) अकोल्याचे आमदार साजिद पठाण यांनी छत्रपती संभाजीनगरला येऊन या भागाची पाहणी केली आणि महापालिका आयुक्तांना इशारा दिला, की उत्तर प्रदेशमधील बुलडोझर राज इथे चालू देणार नाही!
पैठण गेटच्या कारवाईमागे खुनाची घटना आहे. या कारवाईसाठी सिल्लेखान्यातील कुरेशी समाजाने प्रशासनावर दबाव आणला होता. त्यामुळे एमआयएमने या विषयावर फारसे लक्ष घातल्याचे दिसून येत नाही. अशा वेळी मालमत्ताधारक आणि अतिक्रमणधारकांनी काँग्रेसचा आश्रय घेतल्याचे दिसून येत असून, काँग्रेसने या विषयावर पुढे येऊन महापालिका आयुक्तांविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. माजी खासदार इम्तियाज जलील यांना पर्याय म्हणून अकोल्याचे आक्रमक आमदार साजिद पठाण यांना बोलाविण्यात आल्याचे दिसून येते. आगामी महापालिका निवडणुकीतही मतांचे धुव्रीकरण या मुद्द्यावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संकटात एमआयएम मदतीला आली नाही, अशी भावना पैठण गेट भागात व्यक्त होत आहे.
दरम्यान, पालकमंत्र्यांनी आ. पठाण यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. मंत्री संजय शिरसाट म्हणाले, की महापालिकेने नोटिसा देऊनच कारवाई केली आहे. यात काही चुकीचे नाही. येथे येऊन कुणीही जातीय तणाव वाढवू नये, अन्यथा या प्रकरणात कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
गरीबांची १२५ दुकाने तोडून त्यांचे रोजगार हिसकावून घेतले. त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आणली. येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात या प्रश्नी सरकारला जाब विचारण्यात येईल.
-आ. साजिद पठाण, अकोला पश्चिम
आणखी महत्त्वाच्या बातम्या
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
By City News Desk
Latest News
18 Jan 2026 12:47:22
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार पुन्हा गोत्यात येण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या जाहीर...

