Amit Shaha in Sambhajinagar : मराठवाड्यातील किमान ३० जागा जिंकण्याचा संकल्प!; अमित शहा म्हणाले, मराठा आंदोलनाची चिंता करू नका, ते सरकार अन्‌ फडणवीस बघतील!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मराठा आंदोलनाची चिंता करू नका ते सरकार आणि उपमुख्यमंत्री फडणवीस बघतील. मागच्यावेळी गुजरातेत ३ आंदोलने सुरू होती, तरीही आपण जिंकलो, असे सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छत्रपती संभाजीनगरच्या पदाधिकारी संवाद बैठकीत एकेक जागा जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करा, असे आवाहन केले. एमजीएम कॅम्पसमधील रुक्मिणी सभागृहात मंगळवारी […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मराठा आंदोलनाची चिंता करू नका ते सरकार आणि उपमुख्यमंत्री फडणवीस बघतील. मागच्यावेळी गुजरातेत ३ आंदोलने सुरू होती, तरीही आपण जिंकलो, असे सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छत्रपती संभाजीनगरच्या पदाधिकारी संवाद बैठकीत एकेक जागा जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करा, असे आवाहन केले.

एमजीएम कॅम्पसमधील रुक्मिणी सभागृहात मंगळवारी (२४ सप्टेंबर) सायंकाळी मराठवाड्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक श्री. शहा यांनी घेतली. त्‍यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, महामंत्री शिवप्रकाश, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, विजया रहाटकर, माजी खा. रावसाहेब दानवे, खा. डॉ. भागवत कराड, खा. अशोक चव्हाण, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आदींची उपस्थिती होती.

श्री. शहा म्हणाले, की महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणारी आहे. कुठल्याही आंदोलनाची चिंता करू नका. अशा प्रकारची आंदोलने हाताळण्याचा अनुभव आमच्या गाठीशी आहे. पटेल आंदोलनावेळी आम्हाला अनेक गावांत प्रवेशबंदी होती. मात्र त्यानंतरची विधानसभा निवडणूक आम्ही मोठ्या बहुमताने जिंकली. तसाच विजय महाराष्ट्रातही मिळवू. प्रत्येकाने तीन कुटुंबीयांचे मतदान करून घ्या. कुठल्याही परिस्थितीत मराठवाड्यातील किमान ३० जागा जिंकण्याचा संकल्प करा.

प्रत्येक बूथवर दहा टक्के मते वाढवा, असे आवाहन त्यांनी केले. ४५ मिनिटांच्या भाषणात गृहमंत्री शहा यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांमधील गटबाजी मिटविण्याची सूचना केली. नेत्यांना आपल्या घरी मनधरणीला येण्याची गरज पडणार नाही, असे काम करा. भाजप मागणाऱ्याला काही देत नाही, मात्र न मागणाऱ्याला देतो. प्रत्येक बूथवरील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते भाजपमध्ये घेऊन या. ज्यांना आंदोलन करायचं त्यांना करू द्या, असा सल्लाही त्यांनी दिला.

अशी सांगितली ब्लू प्रिंट…
राज्‍यातील बूथचे ए, बी, सी, डी असे वर्गीकरण करा. भाजपला हमखास विजय मिळणारे बूथ हे ए वर्गात असतील. विरोधी पक्षांचा प्रभाव असलेल्या बूथचे वर्गीकरण बी, सी, डी असे करावे. विरोधकांच्या बूथप्रमुखांना आपलेसे करा. त्यांच्या बूथवर किमान १० टक्‍के मतदान वाढले पाहिजेत. नवरात्र ते विजयादशमी या सणासुदीच्या दिवसांत जनतेत फिरून संपर्क वाढवा. दुचाकीला झेंडा लावून रॅली काढा. शेतकऱ्यांना भेटून केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती द्या. ऋषी-मुनींचा सन्मान करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. पक्षाच्या सदस्यत्व मोहिमेकडे लक्ष देत सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना पक्षाशी जोडा. पराभूत सरपंचांनाही पक्षात घ्या. बुथ, मंडळ, प्रदेश पातळीवरील कार्यकर्त्यांना व्हॉट्सअॅप ग्रुपशी जोडा. जेथे पक्ष कमकुवत आहे, तेथे शक्तिकेंद्र स्थापन करा. बुथ पातळीवर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना जोडा. बचतगट व स्वयंसहायता गटांच्या बैठका घ्या.

फडणवीस म्हणाले….
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करताना म्हणाले, की लोकसभा निवडणुकीतील नकारात्मकता आता बऱ्यापैकी कमी झालेली आहे. महिला मतदानावर फोकस करा. कारण महिला मतदारांना जात, धर्म, पंथ याच्याशी काही घेणं नसते. ज्यांनी आपल्याला मदत केली आहे, त्यांच्या पाठीशी त्या सदैव राहतात, असे फडणवीस म्हणाले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली!

Latest News

ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली! ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसी परिसरातील वडगाव कोल्हाटीतील गट नं. ९ मधील रहिवासी अनेक वर्षांपासून मुलभूत सुविधांपासून...
एसटी बसने दागिने घेऊन प्रवास करत असाल तर सतर्क व्हा, चोर महिलांच्या टोळ्या तुमचे दागिने चोरून होतील गायब!, शास्‍त्रीनगरातील महिलेचेही सव्वा लाखाचे दागिने नेले...
सिल्लोडच्या अन्वीत तरुणाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या
आदर्श घोटाळ्यातील संशयित महिला चक्क शिंदे गटात दाखल!  
जाधववाडीत २३ वर्षीय तरुणाची आत्‍महत्‍या, प्रेमप्रकरणातून टोकाचे पाऊल : पोलीस सूत्र
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software