आ. अंबादास दानवे यांनी X वर टाकला अमानुष मारहाणीचा व्हिडीओ!; म्हणाले, हा मारकुटा माजी नगरसेवक सावेंचा माणूस!! 

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे आ. अंबादास दानवे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर आज, ११ जानेवारीला एक व्हिडीओ शेअर केला असून, सोबतच मंत्री अतुल सावे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

या व्हिडीओत काही जण एका व्यक्तीला अमानुष मारहाण करत आहेत. आ. दानवे यांच्या पोस्टनुसार, अमानुषपणे मारहाण करणारा व्यक्ती माजी नगरसेवक आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. आ. दानवे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे, की क्रूरता समोर आल्यावर कोणी मंत्रीपद गमावलं तर कुणी तुरुंगात सडतंय. पण मंत्री अतुल सावे यांचा ‘खास माणूस' असलेला हा मारकुटा माजी नगरसेवक कायद्याला मात्र भीक घालत नाही. ‘पार्टी विथ डिफरन्स'च्या छत्राखाली या असल्या धिंगाण्याला किती काळ संरक्षण देणार मेवाभाऊ? दगडाखाली दबलेला तो लाचार माणूस आज कुठे आहे? सत्तेच्या माजात त्याचा आवाजच कायमचा दबून गेला? ज्यांच्या हातात कायदा आहे, त्यांनी गुन्हेगाराची ‘भक्ती' करण्यापेक्षा पीडिताला न्याय देण्याची हिंमत दाखवावी. सत्तेची ऊब असली की गुन्हेगारांचे हात कुणीही बांधू शकत नाही, हेच आजच्या सत्ताधारी मंडळींचे वास्तव आहे! बरोबर न देवाभाऊ?, असा सवाल आ. दानवे यांनी केला आहे.

आ. दानवे म्हणाले, साधा गुन्हाही दाखल नाही!
एका वृत्तवाहिनीशी बोलताना आ. अंबादास दानवे म्हणाले, की हा माजी नगरसेवक भाजपचा आहे. मंत्री अतुल सावे यांचा तो निकटवर्तीय आहे. इतका मोठा दगड तो एका व्यक्तीच्या डोक्यात घालत आहे. या भागाच्या पोलीस स्टेशनमध्ये त्यावर साधा गुन्हासुद्धा दाखल झालेला नाही. ही मस्ती सत्तेमुळे येते. अतुल सावे त्यांना वाचवतात. त्या भागात जनतेने अनधिकृत बांधकामाच्या तक्रारी केल्या आहेत. पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेतात. हा व्हिडिओ महिना, दोन महिन्यापूर्वीचा आहे. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल का केलेला नाही? असा सवाल त्यांनी केला.

माजी नगरसेवकाचा खुलासा...
दरम्यान, आ. दानवे यांनी समोर आणलेल्या व्हिडीओवर संबंधित माजी नगरसेवकाचीही प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांच्या मते, ज्याला मारहाण केली तो व्यक्ती महिलेवर अत्याचार करणारा होता. जेव्हा जेव्हा महिलांच्या सुरक्षेचा विषय येईल तेव्हा तेव्हा आम्ही समोर येऊ आणि त्यासाठी आम्ही जेलमध्ये जाण्यासही तयार आहोत.

एडिटर कमेंट...
माजी नगरसेवकाने ज्या पद्धतीने अमानुष मारहाण त्या व्यक्तीला केली आहे, ते अंगलट येण्याची शक्यता लक्षात घेता आणि सध्याचा निवडणुकीचा काळ पाहता या घटनेला महिला सुरक्षेचा मुलामा लावण्यात येत असल्याचे दिसून येते. या घटनेची सखोल चौकशी होण्याची गरज असून, खरंच त्या व्यक्तीने एका महिलेच्या सुरक्षेला धोका पोहोचवला होता का, तसे असेल तर संबंधित महिलेने त्या व्यक्तीविरुद्ध पोलिसांत तक्रार केली होती का? तक्रार केली नसेल तरी त्या व्यक्तीला इतक्या अमानुषपणे मारहाण करण्याचा हक्क या माजी नगरसेवकाला कुणी दिला असा प्रश्न आहे. त्याला पकडून ते पोलिसांच्या ताब्यातही देऊ शकले असते. या घटनेमागचे नक्की काय राजकारण आहे, हे सखोल पोलीस चौकशीअंतीच समोर येऊ शकेल. 
 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

CM फडणवीस चक्क छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी अन्‌ अनुसूचित जातीचे... रमाई आवास योजनेत मोठा घोटाळा?; जलील यांनी फोडले ‘टोळी’चे बिंग!, सावेंवर काय केले आरोप...

Latest News

CM फडणवीस चक्क छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी अन्‌ अनुसूचित जातीचे... रमाई आवास योजनेत मोठा घोटाळा?; जलील यांनी फोडले ‘टोळी’चे बिंग!, सावेंवर काय केले आरोप... CM फडणवीस चक्क छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी अन्‌ अनुसूचित जातीचे... रमाई आवास योजनेत मोठा घोटाळा?; जलील यांनी फोडले ‘टोळी’चे बिंग!, सावेंवर काय केले आरोप...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी गुरुवारी (१२ मार्च) पत्रकार परिषद घेऊन शहरातील रमाई आवास...
वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग
‘देवगिरी’ सर करण्याआधी प्रत्येक पर्यटकाची कसून तपासणी! आग निष्काळजीपणानेच लागल्याचा संशय
छत्रपती संभाजीनगरात उद्यापासून जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे प्रवचन, दर्शन सोहळा
एक लांडगा घरासमोर आला... असहायपणे उपचार करा म्हणाला, उपचार होताच जंगलात परत गेला... पुस्तकातील गोष्ट नव्हे, फर्दापूरची खरीखुरी घटना आहे!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software