क्रांती चौकात मराठा आंदोलक ‘नजरकैदेत’; ८ सीसीटीव्ही असताना आणखी दोन वाढवले, सीसीटीव्ही आंदोलकांवर रोखले, २४ तास २ पोलीस कर्मचारी तैनात

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मनोज जरांगे यांच्याप्रमाणेच आता क्रांती चौकात उपोषणाला बसलेल्या राजश्रीताई उंबरे या युवतीने मराठा आरक्षणासाठी मोठा संघर्ष सुरू केला आहे. त्यांच्या उपोषणाला आज ११ वा दिवस उजाडला. मात्र यादरम्यान सरकारकडून मराठा आंदोलकांना अक्षरशः नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहे. क्रांती चौकात आणखी दोन सीसीटीव्ही वाढवले असून, या सीसीटीव्हींचा फोकस पूर्णपणे मराठा […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मनोज जरांगे यांच्याप्रमाणेच आता क्रांती चौकात उपोषणाला बसलेल्या राजश्रीताई उंबरे या युवतीने मराठा आरक्षणासाठी मोठा संघर्ष सुरू केला आहे. त्यांच्या उपोषणाला आज ११ वा दिवस उजाडला. मात्र यादरम्यान सरकारकडून मराठा आंदोलकांना अक्षरशः नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहे. क्रांती चौकात आणखी दोन सीसीटीव्ही वाढवले असून, या सीसीटीव्हींचा फोकस पूर्णपणे मराठा आंदोलकांवर असल्याचे वृत्त एका दैनिकाने दिले आहे.

कोणत्‍याही परिस्थितीत आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार राजश्रीताई यांनी केला आहे, दुसरीकडे सरकारकडून हे उपोषण मागे घेतले जावे यासाठी प्रयत्‍न सुरू आहेत. खासदार, पालकमंत्री, मंत्री भेटून गेल्यानंतरही उपोषण मागे घेतले जात नसल्याने आता आंदोलकांचे शिष्टमंडळ मुंबईत बोलावून चर्चेची तयारी सरकारकडून दाखवली जात आहे. मंत्री अतुल सावे यांनी बुधवारी (११ सप्‍टेंबर) उपोषणस्थळी भेट देऊन दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांशी शिष्टमंडळाची भेट घडवून आणत सकारात्‍मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

राजश्रीताई उंबरे यांची प्रकृती अधिकच खालावली असून, त्‍यांच्यात बोलण्याचेही त्राण उरलेले नाही. त्‍यामुळे मराठा आंदोलकांत संताप वाढत चालला आहे. राजश्रीताई यांच्या उपोषणाला दिवसेंदिवस मोठा प्रतिसाद लाभत आहे. क्रांती चौकात जमणाऱ्या मराठा आंदोलकांची संख्या वाढत चालल्याने पोलीस सतर्क झाले असून, आंदोलकांच्या हालचाली टिपल्या जात आहेत. गृहखाते पोलिसांकडून रोज उपोषणकर्त्यांची माहिती घेत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. उपोषणकर्त्यांच्या मागण्या आम्ही सरकारपर्यंत पोहोचवल्या असून, सीसीटीव्हीचा अन्‌ उपोषणाचा संबंध लावू नये, असे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी स्पष्ट केले आहे.

स्मार्ट सिटीच्या सूत्रांनी सांगितले, की पोलिसांच्या आदेशानुसार आम्ही २ कॅमेरे वाढवले असून, त्याचे नियंत्रण क्रांती चौक पोलीस ठाणे, पोलीस आयुक्त कार्यालयात दिले आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, ईडब्ल्यूएस आरक्षण लागू करावे, मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करावे या व इतर २१ मागण्यांसाठी धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या प्रदेशाध्यक्ष राजश्रीताई उंबरे पाटील उपोषण करत आहेत. काहीही झाले तरी मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असे धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळराजे आवारे यांनी सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना

Latest News

१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना १९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील पंढरपूर येथील कामगार चौकातील श्री जगदीश जयदीप इंडस्ट्रीज कंपनीत १९ वर्षीय तरुणाला...
चिकलठाण्याच्या हिनानगरमध्ये गोदामाला भीषण आग, मंडप डेकोरेशनचे लाखो रुपयांचे साहित्य खाक, आकाशात धुराचे लोट
कोलठाणच्या तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगरची दुर्दैवी घटना
लेक-सुनेला भेटायला गेल्या... उल्कानगरीत चोरट्यांनी घर साफ केले, पावणेदोन लाखांची चोरी !
धक्कादायक : एमजीएम हॉस्पिटलमधून रुग्णाच्या नातेवाइक महिलेची पर्स चोरीला गेली...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software