छ. संभाजीनगर ‘पश्चिम’मधून विधानसभा लढण्याची चंद्रकांत खैरेंची घोषणा!; राजू शिंदेंचे टेंशन वाढले…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. भाजपमधून ठाकरे गटात उमेदवारीसाठी आलेल्या राजू शिंदे यांना एकप्रकारे हा इशाराच समजला जात आहे. या मतदारसंघात उमेदवारीवरून मोठा तिढा निर्माण होणार आहे. अंबादास दानवे यांनी मला विश्वासात न घेता राजू शिंदे यांना पक्षात प्रवेश […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. भाजपमधून ठाकरे गटात उमेदवारीसाठी आलेल्या राजू शिंदे यांना एकप्रकारे हा इशाराच समजला जात आहे. या मतदारसंघात उमेदवारीवरून मोठा तिढा निर्माण होणार आहे. अंबादास दानवे यांनी मला विश्वासात न घेता राजू शिंदे यांना पक्षात प्रवेश दिल्याचे खैरे यांनी म्हटल्याने दानवेंवरील रागही कायम असल्याचे दिसून आले आहे.

पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा मी पहिला हिंदू आमदार असल्याचे सांगून खैरे म्‍हणाले, की मी पश्चिम मतदारसंघाचा पहिला आमदार म्हणून निवडून आलो होतो. १९९० पासून प्रत्येक निवडणुकीत मला या मतदारसंघातून चांगली मते मिळाली आहेत. गद्दारांना धडा शिकवण्यासाठी यंदाची विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्‍हणाले. २५ जुलै रोजी शिवशंकर कॉलनीत उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त इंदुरीकर महाराजांचे कीर्तन झाले. त्‍यावेळी त्‍यांनी आपण अजूनही स्पर्धेत असल्याचे जाहीर केले. खैरे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता.

यामुळे ते आता स्पर्धेतून बाहेर पडल्याची चर्चा राजकीय वर्तूळात सुरू झाली होती. मात्र त्‍यांनी विधानसभा निवडणुकीत उतरण्याचे ठरवल्याने अभी पिक्‍चर बाकी है, असेच जणू खैरेंना सांगायचे आहे, हे दिसून येते. खैरेंनी पश्चिममधून लढण्याची तयारी सुरू केल्याने राजू शिंदे यांची चिंता वाढली असून, महायुतीत उमेदवारी मिळण्याची शक्‍यता धुसर असल्याने त्‍यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. मात्र इथेही खैरेंनी दंड थोपटले आहेत.

माझी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. मला गद्दारांना पाडायचे आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यास मी संजय शिरसाट यांना पाडण्यासाठी निवडणूक लढवेन, असे खैरे म्हणाले आहेत. राजू शिंदेंना आमच्याकडे यायचेच होते तर लोकसभा निवडणुकीपूर्वीच ऑफर दिली होती. ते तेव्हाच आले असते तर पश्चिम मतदारसंघातून मला अधिक मते मिळाली असती. मात्र पक्षातील गद्दारांनी ते होऊ दिले नाही, असे खैरै म्‍हणाले. (त्‍यांनी पक्षातील गद्दार कुणाला म्हटले, हे राजकीय सुज्ञास सांगण्याची गरज नव्हे!)

आणखी महत्त्वाच्या बातम्या

१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना

Latest News

१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना १९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील पंढरपूर येथील कामगार चौकातील श्री जगदीश जयदीप इंडस्ट्रीज कंपनीत १९ वर्षीय तरुणाला...
चिकलठाण्याच्या हिनानगरमध्ये गोदामाला भीषण आग, मंडप डेकोरेशनचे लाखो रुपयांचे साहित्य खाक, आकाशात धुराचे लोट
कोलठाणच्या तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगरची दुर्दैवी घटना
लेक-सुनेला भेटायला गेल्या... उल्कानगरीत चोरट्यांनी घर साफ केले, पावणेदोन लाखांची चोरी !
धक्कादायक : एमजीएम हॉस्पिटलमधून रुग्णाच्या नातेवाइक महिलेची पर्स चोरीला गेली...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software