अवैध सावकारी गुंडांनी बांधकाम व्यावसायिकाचे जगणे केले अवघड, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल, दोघांना अटक, ५ लाखांच्या बदल्यात १६ लाख गेले, अडीच एकर जमीन हडपली, ॲट्रॉसिटी, मुलाच्या अपहरणाच्या धमक्या..., छत्रपती संभाजीनगर शहरातील धक्कादायक प्रकार उघड

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : अवैध सावकारी गुंडांच्या टोळीकडून व्याजाने पैसे घेणे शहरातील बांधकाम व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले. १० टक्के व्याजाने ५ लाख रुपये घेतले होते. सावकारी गुंडांनी ५ महिन्यांत मूळ रकमेसह १६ लाख रुपये व्याज उकळले. नंतर धमकावून आणखी १६ लाख ५० हजारांची मागणी केली. गावाकडील अडीच एकर जमीन हडपली. ती परत करण्यासाठी आणखी १६ लाख रुपयांची मागणी केली. बिल्डरचे तीन वेळा अपहरण केले, दिवसभर मारहाण करत होते. बुधवारी (११ मार्च) रात्री पुंडलिकनगर पोलिसांनी या प्रकरणात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.

लखन राजू साबळे (वय ३३), विकी देविदास शिंदे (वय ३३, दोघे रा. ब्रीजवाडी), प्रशांत बंडू ढाकणे (वय ३२, रा. विठ्ठलनगर, रामनगर) आणि व्यंकटेश राजू ढगे (वय २८, रा. भारतनगर, उत्तरानगरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या अवैध सावकारांची नावे आहेत. पैकी लखन साबळे व विकी शिंदेला अटक करण्यात आली केली. बांधकाम व्यावसायिक विश्वजित देशमुख (वय २९, रा. एन ४ सिडको) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. २०२४ मध्ये देशमुख यांनी लखन साबळेचा भाऊ किरण साबळेच्या घराचे बांधकाम केले. त्यावेळी देशमुख यांची लखनसोबत ओळख झाली होती. एप्रिल २०२४ मध्ये आर्थिक अडचण असल्याने देशमुख हे व्याजाने पैसे देणाऱ्याच्या शोधात होते.

त्यावेळी लखनने त्यांना प्रतिमाह १० टक्क्यांनी पाच लाख रुपये देत चार कोरे धनादेश, कोऱ्या बॉण्डवर सह्या घेतल्या. त्यानंतर साबळेने पाचच महिन्यांत देशमुख यांच्याकडून मूळ ५ लाखांसह १६ लाख रुपये व्याज उकळले. मात्र, काही दिवसांत अजून १६ लाख ५० हजार रुपये व्याज मागत धमकावयाला सुरुवात केली. देशमुख यांची करंजखेडची अडीच एकर जमीन नावावर करून देण्याची मागणी केली. ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रशांत ढाकणेच्या कारमध्ये बळजबरीने बसवून कन्नडला नेले. पैशांऐवजी शेतजमीन व्यंकटेश ढगेच्या नावावर करण्यासाठी धमकावले. देशमुख यांनी नकार दिल्यावर चिकलठाण्यातील एका बंद कंपनीत दिवसभर डांबून ठेवले. चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. विकी शिंदे याने सातत्याने देशमुख यांच्या वडिलांना धमकावून विविध कारणांनी साडेचार लाख रुपये उकळले. ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याची अडकविण्याची धमकी देत मुलाच्या अपहरणाची धमकीही देणे सुरू केले. काही दिवसांपूर्वी पुन्हा दोन वेळेस देशमुख यांना दिवसभर चिकलठाण्यातील बंद कंपनीत ठेवून मारहाण केली. कुटुंबाला बेअब्रू करण्याची धमकी दिली.

जाच असह्य झालेल्या देशमुख यांनी ढगेच्या नावावर जमीन करून दिली. फेर लावण्यापूर्वी ही बाब देशमुख यांच्या वडिलांना कळली. वडिलांनी साबळेला संपर्क केला असता त्याने रजिस्ट्री रद्द करण्यासाठी १६ लाख रुपयांची मागणी केली. जमीन परत मिळण्यासाठी देशमुख कुटुंबाने त्यांना १६ लाखांचे दोन धनादेश दिले. ते साबळे व त्याच्या साथीदारांनी प्रवीण मोकळे नावाच्या मित्राच्या बँकखात्यात जमा केले. तेव्हा साबळेने देशमुख यांच्यासोबतचा व्यवहार संपला, असे लेखी लिहून देत धनादेश घेतानाचे छायाचित्रही काढले. देशमुख यांनी पुंडलिकनगर पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक अशोक भंडारे, सहायक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद कऱ्हाळे यांनी बुधवारी रात्रीच साबळे, शिंदेच्या मुसक्या आवळल्या. लखन साबळे व विकी शिंदेला न्यायालयाने १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांना उद्योगमंत्र्यांनी केले आश्वस्त, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अधिकार वापरण्याची केली सूचना, उद्योजकांशी बोलताना काय म्हणाले...

Latest News

छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांना उद्योगमंत्र्यांनी केले आश्वस्त, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अधिकार वापरण्याची केली सूचना, उद्योजकांशी बोलताना काय म्हणाले... छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांना उद्योगमंत्र्यांनी केले आश्वस्त, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अधिकार वापरण्याची केली सूचना, उद्योजकांशी बोलताना काय म्हणाले...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : इराण-इस्त्रायल युद्धामुळे केंद्र सरकारने कमर्शियल गॅसचा पुरवठा बंद केला. गॅसअभावी छत्रपती संभाजीनगरमधील अनेक कंपन्या...
११ लाख ग्राहक, २० हजार सिलिंडर्सची रोजची गरज, ७७ गॅस एजन्सी, ऑनलाइन बुकिंग सेवा बंद... छत्रपती संभाजीनगरमध्ये काय आहे घरगुती गॅस सिलिंडरचे चित्र...
अवैध सावकारी गुंडांनी बांधकाम व्यावसायिकाचे जगणे केले अवघड, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल, दोघांना अटक, ५ लाखांच्या बदल्यात १६ लाख गेले, अडीच एकर जमीन हडपली, ॲट्रॉसिटी, मुलाच्या अपहरणाच्या धमक्या..., छत्रपती संभाजीनगर शहरातील धक्कादायक प्रकार उघड
टवाळखोरांनी हद्दच केली... शाळेबाहेरच दहावीतील विद्यार्थिनीची छेड, भावाने जाब विचारल्याने फायटरने केले रक्तबंबाळ!; वैजापूर तालुक्यातील खंडाळ्याची संतापजनक घटना
समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software