Inspirational story : ३ हजार संसार सावरणारी छत्रपती संभाजीनगरची संघर्षनारी!; काजलताई केदारे केवळ महिलांनाच नाही तर पुरुषांनाही वाटतात आधार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

संजय निकम, अतिथी लेखक
छत्रपती संभाजीनगर : महिला म्हटलं की महिलांचीच बाजू घेणार, असं म्हटलं जातं. पण तसं नाही, ज्याप्रमाणे महिलांचे दुःख त्यांनी समजून घेतले, त्यांना आधार देण्यासाठी कठोर पावले उचलली, त्याचप्रकारे त्यांनी शेकडो भावांचेही अश्रू पुसले... वाळूज औद्योगिक नगरीत राहणाऱ्या सौ. काजलताई केदारे यांच्या सामाजिक कार्याचा प्रवास म्हणूनच अनोखा ठरतो. ३००० संसार त्यांनी आजवर सावरल्याचा जणू विक्रमच घडला आहे. ७८० पुरुषांनाही आधार दिला आहे.

मूळच्या कन्नड तालुक्यातील सासेगाव-मनूर येथील रहिवासी असलेल्या ३४ वर्षीय काजलताई केदारे शेतकरी कुटुंबातून आहेत. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने सातवीतच त्यांचे शिक्षण थांबले. अल्पवयातच कामाची जबाबदारी आली. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी त्यांचे लग्न वडिलांनी लावून दिले. तेही कर्ज काढून. सासरी पोहोचताच काजलताई यांची खरी परीक्षा सुरू झाली. छळाला सामोरे जावे लागले, पण त्या हरल्या नाहीत. मुलांच्या भविष्याचा विचार त्यांनी केला. त्रास असह्य झाल्याने त्यांनी छत्रपती संभाजीनगर गाठले.

नव्याने आयुष्याला वळण देण्याचा निर्धार त्यांनी केला. स्वतःवर झालेले अत्याचार दुसऱ्या महिलांना भोगावे लागू नयेत ही भावना मनात घट्ट बसली. त्यांनी सत्कर्म बहुउद्देशीय सेवाभावी संस्था स्थापन केली आणि त्यांचा संघर्ष जनतेसाठी लढ्यात बदलला. आजपर्यंत त्यांनी व त्यांच्या मंडळाने सुमारे ३००० प्रकरणे अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळली. महिलांना न्याय मिळवून देण्यासोबतच त्यांनी ७८० पुरुषांनाही महिलांकडून होणाऱ्या मानसिक जाचातून मुक्त केले, हे विशेष. हजारो कुटुंबांचे पुनर्वसन, समुपदेशन आणि कायदेशीर सहाय्य केले. त्यांनी महिला बांगडीसारखी नाजूक असते, हा समज त्यांनी पुसला. त्यांच्या कार्याचा गौरव मुंबईत आयर्न लेडी पुरस्कार देऊन झाला होता.

मोलाचा सल्ला...
काजलताई महिलांना सल्ला देताना सांगतात, की आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हा संवाद, माहिती आणि संधींचा मोठा मंच झाला आहे. मात्र महिलांसाठी तो तितकाच धोक्याचा सापळा देखील ठरतो. अनेक वेळा मोबाईलच्या चुकीच्या वापरामुळे किंवा सोशल मीडियावरील निष्काळजी वर्तनामुळे महिलांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. महिलांनी मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर सजगपणे, मर्यादेत आणि स्वतःची गोपनीयता जपून करणे तितकेच आवश्यक आहे. अनोळखी व्यक्तींशी संवाद, वैयक्तिक माहिती किंवा फोटो शेअर करणे, पासवर्ड शेअर करणे  या चुका महिलांनाच संकटात ढकलतात. म्हणूनच स्त्रीने स्वतःची वागणूक कणखर ठेवणे, डिजिटल मर्यादा पाळणे आणि कुठलीही शंका आल्यास त्वरित कायदेशीर मदत घेणे आवश्यक आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कल्पना भागवतचं गूढ कायम... तपास पूर्ण, ‘चौकडी’ न्यायालयीन कोठडीत!

Latest News

कल्पना भागवतचं गूढ कायम... तपास पूर्ण, ‘चौकडी’ न्यायालयीन कोठडीत! कल्पना भागवतचं गूढ कायम... तपास पूर्ण, ‘चौकडी’ न्यायालयीन कोठडीत!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : तोतया आयएएस अधिकारी कल्पना त्र्यंबकराव भागवत (वय ४५, रा. चिनारगार्डन, पडेगाव, छत्रपती संभाजीनगर), तिचा...
शिंदे गटात नवे नाराजीनाट्य, आता ‘पुत्रा’साठी आ. जैस्वाल-तनवाणींमध्ये तणाव!, जंजाळ ‘फ्रंटफूट’वर आल्याने ‘तुपे’ बॅकफूटवर...
भाडेकरू म्हणून राहायला यायचे अन्‌ घरमालकाचे घर साफ करून जायचे, इतक्या दिवसांनी सापडले बंटी-बबली, वाळूज पोलिसांच्या प्रयत्नांना मिळाले यश...
छत्रपती संभाजीनगर क्षेत्रात GSTR 3B कर विवरणपत्र पूर्ततेसाठी विशेष मोहीम सुरू
CM फंडात छत्रपती संभाजीनगरच्या एकाही राजकीय नेत्याने दिली नाही कवडीही!; संस्था-संघटना, सामान्यांनी दिले ३ कोटी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software