Exclusive : सावधान : परदेशी नंबरने बनलेल्या व्हॉट्स ॲप ग्रुपमध्ये लोकांना जोडून पैसे कमवण्याचे आमिष!; लोकांची होतेय फसवणूक!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

जर तुम्ही WhatsApp वापरत असाल तर ही बातमी काळजीपूर्वक वाचा. WhatsApp वर एका नवीन प्रकारचा घोटाळा सुरू झाला आहे. आफ्रिकन देश झिम्बाब्वे देशाचा कोड असलेल्या नंबरने WhatsApp ग्रुप तयार करून करून भारतीयांना त्यात जोडले जात आहे आणि पैसे कमविण्याचे आमिष दाखवून फसवले जात आहे. यापूर्वी अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. तुम्हाही +263 ने सुरू होणाऱ्या नंबरने तयार केलेल्या WhatsApp ग्रुपमध्ये जोडले गेले असेल तर लगेचच लेफ्ट व्हा.

व्हॉट्स ॲप ग्रुपचे नाव: २८०२०३०७७७
आम्ही ज्या व्हॉट्स ॲप ग्रुपचा शोध घेतला तो २८०२०३०७७७ आहे. या ग्रुपमध्ये शेकडो अज्ञात भारतीय नंबर जोडले गेले होते आणि त्यानंतर अनेक संपर्कांनी ग्रुप सोडला आहे. हा एक बनावट ग्रुप होता, त्याद्वारे लोकांची फसवणूक होण्याची शक्यता होती. आम्ही हा लेख लिहित असताना ७४ लोक अजूनही त्या ग्रुपमध्ये आहेत आणि संभाषणांवर लक्ष ठेवत आहेत. आम्हाला फक्त एकाच ग्रुपची माहिती आहे. असे बरेच ग्रुप असू शकतात, जिथे पैसे कमविण्याचे आमिष दाखवून लोकांना फसवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

आधी ग्रुपमध्ये जोडतात, नंतर माफी मागून काम सुरू...
आम्हाला आढळलेला ग्रुप अनन्या मुखर्जी नावाच्या वापरकर्त्याने सुरू केला होता. जी स्वतःला एचआर प्रतिनिधी असल्याचा दावा करत होती. तिने ग्रुपमध्ये अनोळखी नंबर जोडल्याबद्दल माफी मागितली आणि नंतर दावा केला, की तिने हे एका प्रोजेक्टसाठी केले आहे. अनन्या मुखर्जी नावाची वापरकर्ता फक्त इंग्रजीत बोलते आणि YouTube आणि तिच्या चॅनेलवरील जाहिरातींबद्दल बोलत होती. लोकांना काही कामे पूर्ण करण्यास सांगून तिने त्या बदल्यात पैसे देण्याचे आश्वासन दिले जात आहे. असा दावा केला जात होता, की लोक दररोज ३,००० ते ११,००० रुपये कमवू शकतात.

YouTube चॅनेल सबस्क्राइब करण्यासाठी पैसे
WhatsApp ग्रुपमध्ये दिले जाणारे टास्क म्हणजे YouTube चॅनेल सबस्क्राइब करणे आणि टास्कचा स्क्रीनशॉट पाठवणे. त्या बदल्यात पैसे मिळतात, असे म्हटले जात होते. विशेष म्हणजे, ग्रुपमधील काही लोकांनी टास्क पूर्ण केल्याचा आणि पैसे मिळाल्याचा दावाही केला. ग्रुपमधील संभाषणे आणि संदेशांच्या सुसंगत पॅटर्नवरून असे दिसून येते की ग्रुपमधील बरेच लोक संगनमत करत आहेत आणि स्कॅमर असल्याचे जाणवते. हे सर्वजण भारतीय नंबर वापरत असताना हा ग्रुप झिम्बाब्वेचा कोड असलेल्या नंबरचा वापर करून तयार करण्यात आला होता. ज्यामुळे संशय वाढला आहे. ग्रुपवर ज्या YouTube चॅनेलची लिंक दिली आहे, ते चॅनेल पाहता विश्वासार्हता नसल्याचे लक्षात येते. विशेष म्हणजे, अशा पद्धतीने आमिष दाखवून चॅनेलचे हजारो सबस्क्राइबर्स करण्यात आले आहेत. मात्र केवळ चार व्हिडिओच त्यावर दिसतात. असे सूचित होते की हे चॅनेल केवळ फसवणुकीसाठी तयार केले गेले आहे.

अशा व्हॉट्स ॲप ग्रुपवर विश्वास ठेवावा का?
सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने अशा व्हॉट्स ॲप ग्रुप्सवर विश्वास ठेवू नये. हे ग्रुप्स लोकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने तयार केले जातात. तज्ञांचे म्हणणे आहे की व्हॉट्सॲप ग्रुप्सवर थोडे पैसे देऊन लोकांचा विश्वास संपादन केला जातो आणि नंतर पुढील प्रक्रियेसाठी ते इतर प्लॅटफॉर्मवर किंवा फिशिंग लिंक्सवर नेले जातात.

कसे वाचवायचे?
तुमच्या व्हॉट्स ॲप सेटिंग्जमध्ये काही बदल करून, तुम्ही अज्ञात नंबर्सना तुम्हाला ग्रुप्समध्ये जोडण्यापासून रोखू शकता.
तुमच्या मोबाईलवर व्हॉट्स ॲप उघडा आणि वरच्या उजवीकडे असलेल्या तीन बिंदूंवर क्लिक करा.
सेटिंग्जवर क्लिक करा.
अकाउंटवर क्लिक करा.
प्रायव्हसीवर क्लिक करा.
तळाशी ग्रुप्सवर टॅप करा.
तुम्हाला तिथे तीन पर्याय दिसतील. त्यापैकी माझे संपर्क निवडा. आता, ज्यांचा नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह आहे तेच तुम्हाला व्हॉट्स ॲप ग्रुप्समध्ये जोडू शकतील. याचा अर्थ असा की ज्याला तुम्ही ओळखत नाही ते तुम्हाला व्हॉट्स ॲप ग्रुप्समध्ये जोडू शकणार नाहीत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश

Latest News

आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार पुन्हा गोत्यात येण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या जाहीर...
भरधाव पिकअप वाहनाने स्कुटीला उडवले, मायलेकी जखमी, छत्रपती संभाजीनगर शहराजवळील घटना
सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
शिंदे गटाला सोबत घ्यावेच लागणार, पण ‘अटींचा’ भडीमार नको म्हणून भाजपच्या खेळ्या सुरू..., शहर-जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे काय म्हणाले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software