कर्ज घेऊन परदेशात गेलेल्या भारतीय मुलीने ते केले, जे प्रसिद्ध मॉडेल अन् अभिनेत्रीही करू शकणार नाहीत! भविता मांडवा आहे कोण?
या २५ वर्षीय भारतीय महिलेची सध्या जगभरात वाहवा होत आहे. होणार का नाही, भविता मांडवाने कामच तसे उल्लेखनीय केले आहे. जसे अनेक भारतीय विद्यार्थी दरवर्षी पुढील शिक्षणासाठी त्यांची स्वप्ने घेऊन परदेशात जातात, तसेच तीदेखील न्यू यॉर्कमध्ये गेली. पण परदेशात पोहोचल्यावर तिचे जग बदलेल हे कोणाला माहित होते? ती कॉलेजला जाण्यासाठी रोज ट्रेनने प्रवास करायची. एके दिवशी भविता ज्या सबवेवरून जात होती, तिथेच तिचे नशीब बदलले... आता, भविताने अशा कोणत्या गोष्टी साध्य केल्या आहेत, तिचे नशीब कसे बदलले, तिला असे काय मिळाले, की जे यापूर्वी कोणत्याही भारतीय अभिनेत्री किंवा मॉडेलला मिळाले नाही, असे अनेक प्रश्न आपल्याला पडले असतील. सांगायचे हे आहे, की ती जगातील सर्वात मोठ्या ब्रँडचा ती एकमेव चेहरा बनली आहे. पण हे कसे घडले? ही हृदयस्पर्शी कहाणी जाणून घेऊया...
२५ वर्षांची भविता मांडवा हैदराबादची आहे. तिने जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्ये आर्किटेक्चरचे शिक्षण घेतले. त्यानंतर, ती एमए करण्यासाठी न्यू यॉर्कला गेली. ती ट्रेनने कॉलेजला जात होती. भविताने इंस्टाग्रामवर लिहिले, की एक वर्षापूर्वी अटलांटिक अव्हेन्यू सबवे स्टेशनवर एक व्यक्ती तिला भेटली आणि मॉडेलिंगबद्दल विचारणा केली. भविताने नकार दिला. पण जेव्हा तिला त्या व्यक्तीने सांगितले, की ती असे करून तिचे कर्ज फेडू शकते, तेव्हा भविताने विचार केला. त्या व्यक्तीच्या सांगण्यावरून तिने स्वतःचा फोटो Anitta Bitton हिला पाठवला. नंतर ती एका मोठ्या ब्रँडसाठी काम करणाऱ्या Matthieu Blazy ला भेटली... Matthieu हाच तिला भेटलेला तो व्यक्ती होता, ज्याने मॉडेलिंगची ऑफर दिली होती. ती म्हणते, मला अजूनही विश्वास बसत नाही. माझ्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट जादूने चमकू लागली. जी मला मिळेल अशी कधीही कल्पना केली नव्हती. दोन वर्षांपूर्वी, मी पहिल्यांदाच दोन सुटकेस, डोळ्यांतील स्वप्नं आणि स्टुडंट लोन घेऊन भारत सोडले होते.
२०२४ मध्ये भविताला एक मोठी संधी मिळाली. भविताने लक्झरी फॅशन हाऊस Bottega Veneta साठी एक्सक्लुझिव्ह मॉडेल म्हणून पदार्पण केले. सोबतच मॉडेलिंग उद्योगात पाऊल ठेवले. भविताने तिच्या इंस्टाग्रामवर लिहिले, की एक वर्षापूर्वी, मी माझ्या मॉडेलिंग कारकिर्दीला सुरुवात केली. Matthieu Blazy ही पहिली व्यक्ती होती, ज्याच्यासोबत मी काम केले. माझ्या पहिल्या रनवे वॉकपासून ते माझ्या पहिल्या कँपेनपर्यंत, माझे आयुष्य अशा ठिकाणी पोहोचले ज्याची मी कधीही कल्पना केली नव्हती.
मग भविताने इतिहास रचला...
आता भविताची चर्चा यामुळे होत आहे, की तिने लक्झरी फॅशन ब्रँड चॅनेल Métiers d'Art 2026 शो ओपन केला. त्याच लूकमध्ये ज्यात Matthieu Blazy ने तिला पहिल्यांदाच बघितले होते. चॅनेलकरिता शो होस्ट करणारी ती पहिली भारतीय महिला बनली आहे. याबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. मॉडेल बनण्याचे स्वप्न पाहत नसताही नशिबामुळे भविताने हे साध्य केले. लोक तिला आता "आयकॉनिक’ म्हणून ओळखत आहेत.

पालकांना वाटला अभिमान
भविताला चॅनेल ब्रँडसाठी शो ओपन करताना पाहून तिच्या पालकांना खूप अभिमान वाटला. तिने तिच्या पालकांचा एक व्हिडिओ शेअर केला, जो व्हायरल होत आहे. क्लिपमध्ये भविताचे पालक आनंदी आणि भावनिक दिसत आहेत. ते घरातून त्यांच्या मुलीला प्रोत्साहन देत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरीसह अनेक प्रसिद्ध व्यक्ती भविताच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत.
लोक म्हणत आहेत, ‘जादू'
भविताची कहाणी वाचून लोक जादू आणि आयकॉनिक अशा शब्दांचा अर्थ समजू लागले आहेत. प्रत्येकजण म्हणतो, की २५ वर्षांच्या मुलीने जे साध्य केले आहे, ही काही लहान कामगिरी नाही. म्हणूनच प्रत्येकजण तिच्याकडून प्रेरणा घेत आहे. भविता सांगते, की माझ्या पालकांनी मला कधीही एक्सट्राऑडनरी गोष्टींचा पाठलाग करण्यास सांगितले नव्हते. त्यांना फक्त मी आनंदी आणि शांत जीवन जगावे अशी इच्छा होती. मी कधीच कल्पना केली नव्हती की मी इतक्या मोठ्या ब्रँडसाठी सुरुवात करेन.

