सावधान... तुम्हालाही आरटीओ चलनचा व्हॉट्‌स ॲप मेसेज आला असेल तर ओपन करू नका, गजानन कॉलनीतील व्यावसायिक फसले तसे फसू नका..., नक्की काय घडलं...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सध्या सायबर भामट्यांनी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून नागरिकांना गंडविण्याचे प्रकार सुरू केले आहे. त्यापैकीच एक म्हणजे, व्हॉट्‌स ॲपद्वारे आरटीओचे चलन पाठवतात. त्यातील लिंकवर क्लिक केले, की तुमचा मोबाइल हॅक झालाच म्हणून समजा. मोबाइलवर नियंत्रण मिळवून नंतर तुमचे बँक खाते सायबर भामटे रिकामे करतील... असा प्रकार गजानन कॉलनीतील एका व्यावसायिकासोबत घडला असून, जवाहरनगर पोलिसांनी सायबर भामट्याविरुद्ध मंगळवारी (९ डिसेंबर) गुन्हा दाखल केला आहे.

रवि प्रभाकर ढोरजे (वय ५२, रा. गजानन कॉलनी, रिलायन्स मॉलमागे) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्यांचा हॉटेल रूद्र फूडकोर्ट नावाने सुतगिरणी रोड इलिटकेअर हॉस्पिटलजवळ व्यवसाय आहे. त्यांना एका अनोळखी नंबरवरून व्हॉटस्‌ ॲपव्दारे RTO चलनच्या नावाने एक फाईल मोबाइलवर आली. ती बघण्यासाठी ओपन केली. त्यानंतर १० मिनिटांनी फ्लिपकार्टचा लॉगिनचा मेसेस आला. तो ढोरजे यांना कळला नाही. दोन ते तीन मिनिटांनी १२० रुपये ट्रान्‍झेक्शनचा मेसेज आला. ओटीपीही आला नव्हता. पुन्हा तीन ते चार मिनिटांत नवीन ट्रान्‍झेक्शन ५८ हजार २१७ रुपयांचा ओटीपी न येता झाले. त्यामुळे ढोरजे यांनी लगेचच एसबीआयचे कार्ड ब्लॉक केले.

त्यानंतर एसबीआयच्या कस्टमअर केअरला कॉल करून तक्रार केली. याच काळात हॅकरने त्यांच्या मोबाइलवर नियंत्रण मिळवत इनकमिंग कॉल डायव्हईट करून ठेवले. त्यानंतर ढोरजे यांनी त्यांचा मोबाइल फॅक्टरी रिसेट करून घेतला. दुसऱ्या दिवशी २६ मिनिटांनी दुपारी २ ला मोबाइल चालू करून त्यात फ्‍लिपकार्डचे ॲप्लिकेशन तपासले. त्यात ५८ हजार २१७ रुपयांचा आयफोन फ्रॉड करून खरेदी केल्याचे दिसले. तो राहुल दास कोलकाता येथील व्यक्ती निघाला. त्यानंतर ढोरजे यांनी लगेचच जवाहरनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन कुंभार करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

गरवारे स्टेडियमवर ‘नो एंट्री’ म्हणताच तरुणांचा मोर्चा जी. श्रीकांत यांच्या बंगल्यावर... काय आहे प्रकरण...

Latest News

गरवारे स्टेडियमवर ‘नो एंट्री’ म्हणताच तरुणांचा मोर्चा जी. श्रीकांत यांच्या बंगल्यावर... काय आहे प्रकरण... गरवारे स्टेडियमवर ‘नो एंट्री’ म्हणताच तरुणांचा मोर्चा जी. श्रीकांत यांच्या बंगल्यावर... काय आहे प्रकरण...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : आओ जाओ घर तुम्हारा, अशी म्हण सध्या गरवारे स्टेडियमला लागू होते. नियमांची अंमलबजावणी केल्यानंतर...
इंडियाची सेवा येतेय पूर्वपदावर, उद्यापासून पुन्हा रात्रीचे मुंबई-छत्रपती संभाजीनगर विमान भरणार उड्डाण!, हैदराबाद विमान मात्र १६ ते ३१ डिसेंबरपर्यंत रद्द
द्वारकानगरातील तरुणाचा मृतदेह हर्सूल तलावात आढळल्याने खळबळ!, आत्‍महत्‍या की घातपात?
छत्रपती संभाजीनगरमध्ये जामिनाची ऑर्डर देत नाही म्हणून संशयिताच्या पित्याने वकील महिलेला धमकावल्याची तक्रार!
कल्पना भागवतचं गूढ कायम... तपास पूर्ण, ‘चौकडी’ न्यायालयीन कोठडीत!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software